मुंबई : नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘बाप बीप बाप’ (Baap Beep Baap) या वेबसीरिजची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. या वेबसीरिजमधील वडील – मुलाच्या (Father-Son Relation) नात्यातील सुंदर प्रवासाची गोष्ट प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. आता याच वेबसीरिजमधील ‘वय नाही’ हे धमाल गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे.
मुलगा आणि वडील यांच्या नात्यात काही गोष्टी समजून उमजून केल्या तर त्यांच्यातील जनरेशन गॅप नकळत मिटत जात, एक मैत्रीचे बंध आपसूकच निर्माण करणारे हे गाणे आहे. हे भन्नाट गाणे अवधूत गुप्ते आणि रोहन-रोहन यांनी गायले आहे.
पाहा ‘वय नाही’ गाणं
शरद पोंक्षे यांनी व्यक्त केल्या भावना
‘बाप बीप बाप’मध्ये वडिलांची भूमिका साकारणारे शरद पोंक्षे संगणक हाताळताना, व्यायाम करताना, आपल्या मुलाबरोबर आणि त्याच्या मित्रांमध्ये मिसळण्याचा, मुलाच्या रिलेशनशिपला स्वीकारताना दिसत आहेत. ते ज्या ज्या गोष्टी करत आहेत त्यातून दिसतेय की, वय हा केवळ एक आकडा आहे. मुलांशी समवयस्क होऊन वडिलांनी त्यांच्याशी जवळीक साधली तर हे नाते अधिक बहरू शकते, अशा पद्धतीचे हे गाणे आहे. हे गाणे प्रत्येक पालकाने ऐकावे, असे आहे. या गाण्याला रोहन-रोहन यांनी संगीत दिले आहे.
मुलाची आईसोबत जितकी जवळीक असते तितकीच भीती, दरारा वडिलांबाबत असतो
वडील -मुलाचे नाते हे नेहमीच तणावपूर्ण आणि संवेदनशील राहिले आहे. मुलाची आईसोबत जितकी जवळीक, मैत्रीपूर्ण नाते असते, तितकीच भीती, दरारा वडिलांबाबत असतो. एकमेकांमध्ये सुसंवाद नसतो, अनेकदा एकमेकांविषयी प्रेम असूनही ते व्यक्त करण्यासाठी दोघेही संकोच करतात. अशाने त्यांच्या नात्यातील दरी अधिकच खोल होत जाते. अशा या गुंतागुंतीच्या नात्यावर भाष्य करणारी ‘बाप बीप बाप’ वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर 31 ऑगस्टपासून आपल्या भेटीला आली आहे. वडील – मुलाचे अवघड नाते यात दिसत आहे. लॉकडाऊन आधी कधीच एकत्र वेळ न घालवलेल्या वडील-मुलाला जेव्हा लॉकडाऊनमुळे नाईलाजास्तव एकमेकांबरोबर वेळ घालवावा लागतो तेव्हा नक्की काय होते? या काळात नात्यातील संवाद गवसतो का? त्यांच्या नात्याचा हा गुंता सुटतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वरील ‘बाप बीप बाप’ पाहिल्यावर तुम्हाला मिळतील.
अमित कान्हेरे यांनी हा विषय अतिशय छान पद्धतीने हाताळला आहे. थोडेसे अबोल, संकोच असलेले हे नाते उगीचच गंभीर न करता अतिशय गोड आणि हलक्या फुलक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडले आहे. या वेबसीरिजचे लेखन प्रतिक उमेश व्यास आणि अमित कान्हेरे यांनी केले असून संवाद योगेश जोशींनी लिहिले आहेत तर छायाचित्रणाची धुरा विशाल सांघवाई यांनी सांभाळली आहे.
संबंधित बातम्या
Samantha : घटस्फोटाच्या बातमी दरम्यान समंथाने शेअर केले ग्लॅमरस फोटो, हे फोटो पाहाच
The Kapil Sharma Show : ‘थलायवी’ च्या टीमसोबत कंगना रनौतची ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये एन्ट्री, पाहा फोटो