ॲक्शन सीन करणं सोपं नसतं हो! 27 किलोंचा कॅमेरा हाती घेऊन रोहित शेट्टीने शूट केलेला हा Video एकदा पाहाच!

| Updated on: May 24, 2022 | 10:23 AM

रोहित आता पहिल्यांदाच ॲक्शनने (action sequence) परिपूर्ण असलेली वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय. 'इंडियन पोलिस फोर्स' (Indian Police Force) असं या सीरिजचं नाव आहे. या सीरिजची शूटिंग सध्या सुरू असून पडद्यामागील दृश्यांचा एक व्हिडीओ त्याने सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट केला.

ॲक्शन सीन करणं सोपं नसतं हो! 27 किलोंचा कॅमेरा हाती घेऊन रोहित शेट्टीने शूट केलेला हा Video एकदा पाहाच!
action sequence
Image Credit source: Instagram
Follow us on

दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) म्हटलं की, कॉमेडी, ॲक्शन, ड्रामा याने परिपूर्ण असलेला मसालापट डोळ्यांसमोर येतो. रोहित आता पहिल्यांदाच ॲक्शनने (action sequence) परिपूर्ण असलेली वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय. ‘इंडियन पोलिस फोर्स’ (Indian Police Force) असं या सीरिजचं नाव आहे. या सीरिजची शूटिंग सध्या सुरू असून पडद्यामागील दृश्यांचा एक व्हिडीओ त्याने सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा ॲक्शन सीक्वेन्स करताना पहायला मिळत आहे. तर खुद्द रोहितने हा सीन शूट केला आहे. ‘ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सिद्धार्थसोबतच अभिनेत्री शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय यांच्याही भूमिका आहेत.

‘काचा फोडणं, एकमेकांना मुक्के मारणं आणि पायऱ्यांवरून घरंगळत खाली पडणं हे आपल्यासाठी खूप नॉर्मल वाटणं विचित्र वाटतं. असो.. माझ्या हातातील कॅमेरा हा 27 किलोंचा आहे’, असं कॅप्शन देत रोहितने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पडद्यावर सहज वाटणारे ॲक्शन सीन्स कसे चित्रित केले जातात, याची झलक या व्हिडीओत पहायला मिळतेय. याआधीही सिद्धार्थने पडद्यामागचा एक व्हिडीओ शेअर केला होता. रोहित शेट्टीचा हिरो म्हणजे प्रोजेक्टमध्ये अक्षरश: रक्ताचं पाणी करून काम करावं लागतं, असं त्याने म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

या सीरिजबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “या सीरिजला खूप मोठं बनवायचं, हे एकच माझं ध्येय आहे. आपण परदेशातल्या अनेक सीरिज पाहतो. त्यात चुकीचं काहीच नाही, पण भारतातही अशा सीरिज बनायला हव्यात आणि मला हेच करायचं आहे. इंडियन पोलीस फोर्स ही सीरिज माझ्यासाठी खूप खास आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी त्यावर काम करतोय.”