मुंबई : अभिनेत्री मानवी गागरू हिने गुपचूप साखरपुडा करत चाहत्यांना मोठा धक्का दिलाय. फॉर मोर शॉट्स या वेब सीरिजमध्ये मानवी मुख्य भूमिकेत होती. मानवी गागरू (Maanvi Gagroo) हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना साखरपुडा झाल्याची माहिती दिली. या फोटोमध्ये मानवीच्या हातामध्ये साखरपुड्याची रिंग दिसत आहे. आता मानवीचे हे फोटो (Photo) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. मानवी गागरू हिला ट्रिपलिंग या वेब सीरिजमधून खरी ओळख मिळालीये. मानवीच्या साखरपुड्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर चाहते मानवीचे अभिनंदन करताना दिसत आहेत.
मानवी गागरू हिने साखरपुडा झाल्याची घोषणा केलीये. मात्र, अजूनही तिने हे जाहिर केले नाहीये की, तिने साखरपुडा नेमका कोणासोबत केला हे अजून कळू दिले नाहीये. मानवी गागरू हिने अगदी गुपचूप पध्दतीने साखरपुडा केला.
इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत मानवीने म्हटले की, म्हणजे #Engaged झाली… अभिनेत्रीने रेड हार्ट इमोजी देखील शेअर केले आहेत. फोटोमध्ये, मानवी तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉंट करताना हसत आहे.
मानवी गागरूने साखरपुड्यामधील फोटो अजूनही शेअर केले नाहीत. चाहते तिच्या साखरपुड्यामधील फोटोंची वाट पाहात आहेत. मानवीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे.
आता सोशल मीडियावर चाहते मानवी गागरू हिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी प्रश्न विचारताना दिसत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल काही माहिती देना…
चाहत्यांना आता हे जाणून घ्यायचे आहे की, मानवी हिने नेमका कोणासोबत साखरपुडा केला आहे. कारण चाहते मानवीच्या होणाऱ्या नवऱ्याची एक झलक पाहण्यास इच्छुक आहेत.
दुसऱ्या युजर्सने लिहिले की, तुझा होणारा नवरा काय काम करतो आणि तो कुठे असतो…मानवीने जो फोटो शेअर केलाय. तो विदेशातील दिसत असून ती एका हाॅटेलमध्ये बसलेली दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा होत्या की, मानवी गागरू ही एका व्यवसायिकाला डेट करत आहे. मात्र, मानवीने कोणासोबत साखरपुडा केला हे अजून कळू शकले नाहीये. सध्या मानवी विदेशात असल्याचे सांगितले जातंय.
मानवीने जो फोटो शेअर केलाय, त्यावर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत तिला शुभेच्छा देत असून या फोटोला लाईक देखील करत आहेत. हा फोटोवर व्हायरल होताना दिसत आहे.