दत्तात्रेयांच्या ध्येयवेड्या भक्तांचे अवधूत चिंतन!, दत्त संप्रदायासाठी नवं ओटीटी चॅनेल सुरू!
गुरु दत्त महाराजांच्या अवतारांच्या चरित्र कथा "अवधूत चिंतन" या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सीरिज माध्यमातून प्रथमच येत आहेत. (Avadhut Chintan of Dattatreya's ambitious devotees !, New OTT channel launched for Datta Sampradaya!)
1 / 5
'अवधूत चिंतन क्रिएशन्स प्रा.ली.' या संस्थेने नुकतेच 'अनघाष्टमी'च्या मुहूर्तावर "अवधूत चिंतन" या मोबाईल ॲपचे म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मचे लोकार्पण केले आहे. दत्तात्रय महाराजांच्या ध्येयवेड्या भक्तरुपी सेवकांनी मिळून 'श्री गुरुदेव दत्त महाराजांविषयीची माहिती जगभरात सर्वत्र नव्या पिढीपर्यंत पोहचत रहावी म्हणून हे महत्वाकांक्षी कार्य सुरु करण्यात आलं आहे.
2 / 5
श्री गुरु दत्त महाराजांच्या अवतारांच्या चरित्र कथा "अवधूत चिंतन" या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सीरिज माध्यमातून प्रथमच येत आहेत.अध्यात्म आणि मनोरंजन यांचा सुरेख मिलाफ असणाऱ्या "श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये" आणि 'श्री स्वामी समर्थ' यांच्या वरील मालिका "स्वामी हो..." या प्रेक्षकांच्या पसंतीस अल्पावधीतच उतरल्या आहेत. या दोन्ही सीरिज साठी अत्यंत श्रवणीय असे संगीतआणि पार्श्वसंगीत प्रभाकर नरवडे यांनी दिले असून सर्व गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
3 / 5
"श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये"मध्ये स्वानंद देसाई,अनिल छत्रे, सलोनी सुर्वे, हेमंत चक्रदेव, प्रभाकर डाऊल तर श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या मध्यवर्ती भूमिकेत सौरव फाटक असून "स्वामी हो..."मध्ये स्वामी रूपात अनिल छत्रे यांनी भूमिका लीलया पेलली आहे.
4 / 5
"अवधूत चिंतन" या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या निर्मिती प्रक्रियेत प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक श्री. असित रेडीज, श्री. मिलिंद जाधव, आणि श्री. तेजस आर्ते यांनी सेवेकरी या नात्याने अहोरात्र मेहनत घेऊन हे अत्यंत वेगळे आणि सकस मनोरंजनासोबतच महत्वपूर्ण माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे.
5 / 5
या ओटीटी प्लॅटफॉर्मचे कंटेंट हेड आणि क्रिएटिव्ह हेड श्री. असित रेडीज असून , ख्यातनाम लेखक श्री. प्रविण शांताराम यांनी वरील दोन्ही सीरिजचे पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. दिग्दर्शनाची धुरा श्री. असित रेडीज यांच्या सोबतीने श्री. दीपक देसाई यांनी सांभाळली आहे.