मुंबई : अभिनेता बॉबी देओलच्या ‘आश्रम’ (‘Ashram 3’) या वेब सीरीजचे दोन्ही सीझन खूप पसंत केले गेले होते. आता प्रकाश झा यांनी या वेब सीरीजच्या तिसऱ्या सीझनची तयारी सुरू केली आहे. ‘आश्रम 3’चे शूटिंग भोपाळमध्ये सुरू झाले आहे. ही वेब सीरीज पूर्वी देखील हेडलाईन्सचा भाग होती आणि आता पुन्हा एकदा चर्चेचा भाग बनली आहे.
बजरंग दलाच्या लोकांनी भोपाळमधील ‘आश्रम 3’ या वेब सीरीजच्या सेटची तोडफोड केली आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, बजरंग दलाच्या लोकांनी प्रकाश झा यांच्या चेहऱ्यावरही शाई फेकली आहे. या सीरीज नाव बदलावे अन्यथा मध्य प्रदेशात मालिकेचे शूटिंग होऊ देणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते.
बजरंग दलाचे नेते सुशील यांनी म्हटले की, मध्य प्रदेशात चित्रपट उद्योगाला चालना मिळावी अशी आमची इच्छा आहे. लोकांना काम मिळाले पाहिजे, पण ही जमीन हिंदू समाजाचा अपमान करण्यासाठी वापरण्यात येऊ नये. या वेब सीरीजमध्ये आश्रमात महिलांचे शोषण होत असल्याचे दाखवण्यात आले होते. असे आहे का? हिंदूंना फसवणे बंद करा. जर त्यांना लोकप्रियता हवी असेल, तर ते इतर कोणत्याही धर्माचे नाव का घेत नाहीत आणि का पाहत नाहीत की किती आंदोलने आहेत..’
Madhya Pradesh | All the miscreants have been shunned from the premises & no one has been fatally injured, though some vehicles have been damaged. Further action will be taken against those responsible: Irshad Wali, DIG Bhopal on attacks at upcoming web series ‘Ashram 3’ sets pic.twitter.com/jiX9IbyWSh
— ANI (@ANI) October 24, 2021
रिपोर्ट्सनुसार, बजरंग दलाच्या लोकांनी सेटवर ‘प्रकाश झा मुर्दाबाद’, ‘बॉबी देओल मुर्दाबाद’ आणि ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. या वेब सीरीजमधील मुख्य पात्र असलेल्या बॉबी देओलच्या शोधात असल्याचेही त्यांनी सांगितले. बॉबीने त्याचा भाऊ सनी देओल कडून काहीतरी शिकले पाहिजे, असे देखील त्यांनी म्हटले.
बजरंग दलाचे नेते सुशील यांनी म्हटले आहे की, आम्ही फक्त प्रकाश झा यांना इशारा दिला आहे आणि त्यांनी सांगितले आहे की, ते या वेब सीरीजचे शीर्षक बदलण्याबद्दल चर्चा करत आहेत. ते पुढे म्हणाले की, आश्रम या वेब सीरीजचे नाव बदलले पाहिजे, अन्यथा आम्ही त्याचे शूटिंग भोपाळमध्ये होऊ देणार नाही.
बजरंग दलाच्या लोकांनी या वेब सीरीजच्या क्रूवर देखील दगडफेक केली. यानंतर काही क्रू मेंबर्स जखमी झाले. यात कोणालाही फारशी दुखापत झाली नसून, या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचे पात्र एका ढोंगी बाबाची कथा सांगणारे आहे. या वेब सीरीजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला होता. यानंतर दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनानंतर असेच एक संकट कोसळले होते. धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत, करणी सेनेने यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.