ड्रेस घसरला अन् गडबड झाली, ‘फिटनेस क्वीन’ मलायका अरोरा Oops Momentची शिकार ठरली!

| Updated on: Nov 27, 2021 | 1:37 PM

स्टाईल असो किंवा फिटनेस अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या चाहत्यांना प्रभावित करण्यात कधीही कमी पडत नाही. फॅशनचा विचार केला, तर मलायका नेहमीच बोल्ड आऊटफिट्सची निवड करते.

ड्रेस घसरला अन् गडबड झाली, ‘फिटनेस क्वीन’ मलायका अरोरा Oops Momentची शिकार ठरली!
Malaika Arora
Follow us on

मुंबई : स्टाईल असो किंवा फिटनेस अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या चाहत्यांना प्रभावित करण्यात कधीही कमी पडत नाही. फॅशनचा विचार केला, तर मलायका नेहमीच बोल्ड आऊटफिट्सची निवड करते. तिच्या जिम लूकपासून, तिच्या रेड कार्पेट लूकपर्यंत, ती नेहमीच चाहत्यांना आश्चर्यचकित करते. पण, अलीकडेच एका इव्हेंटदरम्यान मलायका अरोरा Oops मोमेंटची शिकार झाली.

रीविलिंग प्रकट आऊटफिट असो किंवा बोल्ड ड्रेसमध्ये कॅटवॉक असो, बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींना देखील अशा Oops क्षणांचा सामना करावा लागला आहे आणि अलीकडेच मलायका अरोरासोबत असेच काहीसे घडले आहे. आज, आम्ही तुम्हाला 2020च्या ‘मिस दिवा युनिव्हर्स ग्रँड फिनाले’च्या रेड कार्पेटवर घडलेल्या एका घटनेबद्दल सांगणार आहोत.

बोल्ड ड्रेसमध्ये अनेक रंगछटा

या कार्यक्रमात मलायका अतिशय बोल्ड ड्रेस परीधान करून पोहोचली होती. मलायकाने पिवळ्या रंगाचा मल्टीपल लेयर्स असलेला फ्लोर-स्वीपिंग वन-शोल्डर रफल्ड गाऊन कॅरी केला होता. हा पोशाख जॉर्ज व्हील नावाच्या डिझायनर लेबलचा हाय थीग्स स्लिट गाऊन होता. या गाऊनला पिवळ्या रंगाच्या अनेक छटा होत्या आणि रफल्सने तयार केलेल्या फुलांच्या पॅटर्नने ड्रेसला आणखी खास बनवले होते.

…अन् Oops Momentची शिकार झाली!

लूक पूर्ण करण्यासाठी मलायकाने सुंदर अशा सोनेरी स्ट्रॅपी हिल्स परिधान केल्या होत्या आणि डायमंड इअर रिंग्स परिधान करत आपल्या लुकची शोभा आणखी वाढवली होती. मलायका अरोराच्या लूकने प्रत्येकजण प्रभावित झाला होता. परंतु, ती माध्यमाच्या कॅमेऱ्यासाठी पोझ देत रेड कार्पेटवर चालत असतानाच, तिच्या या हाय थाय स्लिट गाऊनमुळे ‘Oops Moment’ला बळी पडली. वास्तविक तिचा हा ड्रेस काहीसा खाली सरकलेला पाहायला मिळाला, यामुळे तिला ट्रोल देखील करण्यात आले.

मलायकाचे फोटो व्हायरल

मलायका अरोराचे हे फोटो कॅमेऱ्यांनी टिपले आणि तेव्हापासून अभिनेत्रीचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होऊ लागले. अभिनेत्रीची ही बोल्ड स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. पण, त्याचवेळी असा ड्रेस घातल्याने अनेकांनी तिला ट्रोल देखील केले.

हेही वाचा :

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding | संगीत, मेहंदी अन् शाही विवाह, ‘या’ दिवशी रंगणार कतरिना-विकीच्या लग्नाचे सोहळे!

दिशा पटानीच्या नाकावर शस्त्रक्रिया? अभिनेत्रीला पाहून चाहते म्हणाले ‘हिनेही चेहऱ्याची वाट लावली..’