मुंबई : प्रेम तुम्हाला अनपेक्षित गोष्टी करण्यास भाग पाडते. परंतु सूडबुद्धीची आग तुम्हाला अशा काही गोष्टी करण्यास भाग पाडते, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. बहुप्रतीक्षित ‘एक थी बेगम’ चा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला असून, यात अनुजा साठे अशरफ भाटकरच्या भूमिकेची पुनरावृत्ती करताना दिसेल. मात्र, यावेळी ती लीला पासवान या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मकसूदचे बेकायदेशीर साम्राज्य उलथवून टाकण्याचा आणि तिचा पती झहीरच्या (अंकित मोहन) मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रतिज्ञेचे पालन करत, ती या सीझनमध्ये निर्भयपणे पुरुषांच्या जगात वर्चस्व गाजवताना दिसणार आहे. अंडरवर्ल्ड, पोलीस आणि राजकारणी असे सत्तेतील सगळेच तिच्या शोधात आहेत.
प्रसिद्ध लेखक आणि माजी तपास पत्रकार हुसेन जैदी यांनी आपल्या या शोमध्ये अशरफच्या कथेवर आपले विचार मांडले. माफियांच्या जगात अनेक वर्षांचा अनुभव, संशोधन, तळागाळात काम आणि ज्ञानासह, जैदी यांनी अनेक बेस्ट सेलिंग फिक्शन आणि नॉन-फिक्शन कादंबऱ्या लिहिल्या आहेत.
या मालिकेबद्दल बोलताना हुसेन जैदी म्हणाले की, ‘अंडरवर्ल्ड हे पूर्णपणे वेगळे जग आहे आणि या विषयावर आधारित शो करण्यासाठी खूप संशोधन करावे लागते. ‘एक थी बेगम सीझन 1’ मध्ये अशरफ भाटकर यांची कथा होती, ज्यांनी आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्डमध्ये भूकंप निर्माण केला. शोचे निर्माते आणि अभिनेत्री अनुजा साठे यांनी प्रेक्षकांना खऱ्या आणि गडद अंडरवर्ल्डचे जवळचे दृश्य दाखवले आहे.
लेखक, दिग्दर्शक सचिन दरेकर म्हणतात, ‘गुन्हेगारी विश्वाने मला नेहमीच आकर्षित केले आहे. बंदुका आणि टर्फ युद्धांमुळे नाही तर या गुंडांवर राज्य करणाऱ्या अंतर्निहित भावनांमुळे. सिझन 2मध्ये सूड उगवण्याची भावना, ज्या गोष्टींच्या तुम्ही विरोधात आहात, त्याच गोष्टी करणे आणि या गोष्टी करताना तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या लोकांची किंमत मोजावी लागणे, हे दाखवण्यात आले आहे.’
सीझन 1मध्ये अशरफच्या आयुष्यावर भाष्य करण्यात आले आहे. ज्यात तिचा पती झहीर, एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन मकसूदचा (अजय गेही) विश्वासू होता, जो मारला गेला. त्यानंतर अशरफ सपना या नावाने बार डान्सर बनून झहीरच्या हत्येसाठी जबाबदार ठरलेल्या प्रत्येकाला मारण्याची योजना आखते. मात्र तिच्या योजना निष्फळ ठरतात आणि सीझन 1चा शेवट अशा एका टप्प्यावर येतो जिथे अशरफ जिवंत राहणार की नाही, हा प्रश्न उद्भवतो.
‘एक थी बेगम’ ही सीरीज, आता एमएक्स प्लेअरवर विनामूल्य प्रवाहित होत आहे. सचिन दरेकर आणि विशाल मोढावे यांनी ही सीरीज दिग्दर्शित केली आहे. यात शहाब अली, चिन्मय मांडलेकर, विजय निकम, रेशम श्रीवर्धनकर, राजेंद्र शिसातकर, नजर खान, हितेश भोजराज, सौरसेनी मैत्रा, लोकेश गुप्ते, मीर सरवर, पूर्णानंद वंदेकर आणि रोहन गुजर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Birthday Special : वडिलांच्या मृत्यूनंतर ढाब्यावर काम, जाणून घ्या संजय मिश्रांच्या आयुष्यातील चढउतारhttps://t.co/eE5KC4rIc8#BirthdaySpecial #SanjayMishtra #Bollywood
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 6, 2021