मुंबई : डिजिटल प्लॅटफॉर्मने गेल्या काही वर्षांत देशात फार वेगाने आपले पाय पसरले आहेत. कोरोनाच्या काळात त्याला आणखी बळ मिळाले आहेत. मात्र, कोरोना कमी झाल्यानंतरही लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याला कंटाळा करत आहेत. आता लोकांची पहिली पसंती म्हणजे घरी बसून OTT वर मनोरंजनाचा आनंद घेणे. ओटीटीवर दररोज काहीतरी नवीन प्रसारित केले जात आहे, जेणेकरून प्रेक्षकांना मनोरंजनाची कमतरता भासू नये.
जर, तुम्हालाही घरी बसून कंटाळा येत असेल, तर तुमच्या कंटाळ्यावर आमच्याकडे उपाय आहे. आम्ही तुम्हाला एक छोटासा मार्ग दाखवणार आहोत आणि यासाठी तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल उचलण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला अशा पाच वेब सीरीज बद्दल सांगणार आहोत, ज्या तुमचा कंटाळा दूर करण्यासाठी अतिशय योग्य आहेत आणि तुम्ही त्या तुमच्या मोबाईलवर पाहू शकता.
नेटफ्लिक्सची सुपरहिट स्पॅनिश क्राइम थ्रिलर वेब सीरीज मनी हाईस्ट लोकांच्या आवडत्या वेब सीरीजच्या यादीत अव्वल आहे. ही सीरीज रिलीज झाल्यानंतर अनेक दिवस ट्रेंडिंगमध्ये राहिली होती.
ही नेटफ्लिक्सची वेब सीरीज दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरियाचा सर्वात घातक स्पोर्ट्स थ्रिलर स्क्विड गेम्स, जो सध्या नेटफ्लिक्सवर प्रसारित केला जात आहे. सध्या ओटीटीवर देखील याचे वर्चस्व आहे. स्क्विड गेम्स 90 देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. यात हे दाखवले आहे की, जगातील सर्व श्रीमंत सुखी नाहीत किंवा सर्व गरीब सुखी नाहीत. श्रीमंत लोक स्वतःच्या आनंदासाठी लोकांना मारत आहेत. त्यांना फक्त पैसे हवे होते, मग ते कुणाला मारायचे किंवा स्वत:ला मारायचे. दरम्यान, मानवी लोभाने यात महत्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे लोक एकमेकांना मारू लागले.
Mindhunter एक अमेरिकन मानसशास्त्रीय गुन्हेगारीवर आधारित वेब सीरीज आहे, जी पेनहॉलने तयार केली आहे. ही सीरीज खऱ्या घटनेवर लिखित पुस्तकावर आधारित आहे Mindhunter ही जगातील सर्वात लोकप्रिय वेब सीरीज आहे. तुम्ही ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
Amazon प्राईम व्हिडीओवर प्रसारित होणारी मुंबई डायरी ही सीरीज देखील या दिवसांमध्ये खूप गाजत आहे. जर, तुम्ही अजून ही सीरीज पाहिले नसेल तर नक्की पाहा.
कोटा फॅक्टरीचा दुसरा सीझन देखील लोकांना आवडत आहे. नेटफ्लिक्सवर प्रसारित होत असलेल्या शोमध्ये जीतू भैय्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. यामध्ये कोचिंग हबमधील विद्यार्थ्यांवरील दबावाची आणि संघर्षाची कहाणी सुंदरपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, दुसरा सीझन बघण्यापूर्वी याचा पहिला सीझन बघणे अतिशय महत्त्वाचे आहे.