मुंबई : बहुतेक लोकांना आठवड्याच्या शेवटी कामातून सुट्टी असते, मोकळा वेळ असतो. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत चित्रपट किंवा वेब सीरीज पाहू शकता. आज (16 ऑक्टोबर) अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक धमाकेदार वेब सीरीज प्रदर्शित होत आहेत. जर, तुम्हाला वेब सीरीज आणि चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर घरी बसून बोर होण्याऐवजी तुम्ही काही सीरीज-चित्रपट पाहू शकता. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि झी 5वर कोणत्या नव्या सीरीज आणि चित्रपट या आठवड्यात रिलीज होत आहेत, ते पाहूया….
मिसफिट द सीरीज
‘मिसफिट द सीरीज’ ही एक म्युझिकल सीरीज आहे. ही सीरीज हुगलँड स्क्वॅलँड म्युझिकल हायस्कूलच्या कथेवर बेतलेली आहे. जिथे मुले त्यांची संगीतमय स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आली आहेत. मुले संगीत आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात व्यस्त असताना, त्यांचे शिक्षक येतात आणि त्यांना सांगतात की हायस्कूलचे बोर्डिंग स्कूलमध्ये रूपांतर होत आहे. यासह मुलांचे पथक तयार केले जात आहे. प्रत्येक पथकाला शिस्तीसह चांगले गुण मिळवावे लागतात. हे सर्व एकमेकांसाठी मिसफिट आहेत आणि येथूनच कथेमध्ये ड्रामा सुरू होतो. ही सीरीज आज (16 ऑक्टोबर) नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.
‘वंडरलस्ट’ आज म्हणजेच 16 ऑक्टोबर 2021 रोजी Amazon Prime Video वर रिलीज होत आहे. ही कथा जेनिफर अॅनिस्टन आणि रुड जॉर्जिया या विवाहित जोडप्याचे आयुष्य दर्शवते. या चित्रपटात विनोदासह अनेक भावना एकत्र दिसतील.
‘सरदार उधम’ मध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तो एका स्वातंत्र्य सेनानीची भूमिका साकारत आहे. Amazon Prime Video वर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटामध्ये विकी कौशल सरदार उधम यांची भूमिका साकारत आहे. ज्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी जनरल डायरला लंडनमध्ये गोळ्या घातल्या होत्या. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत.
‘सरदार उधम’ हा एका स्वातंत्र्य सेनानीचा बायोपिक आहे. सरदार उधम यांच्या जीवनाची कथा या चित्रपटात सांगितली गेली आहे, जी नक्कीच जाणून घेण्यासारखी आणि पाहण्यासारखी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शूजित सरकार आहेत. ‘सरदार उधम’ हा एक चित्रपट आहे, जो तुम्हाला संपूर्ण वेळ खिळवून ठेवेल. चित्रपटाच्या शेवटच्या तासात तुम्ही जनरल डायरचा तिरस्कार करू लागता. कारण, तुम्ही चित्रपटात इतके रमता की, तुम्हाला ती पात्रे जाणवू लागतात. हा एक पिरीयड बायोपिक आहे जो बॉलिवूडमध्ये बनवलेल्या उर्वरित चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे.
हेमा मालिनी ते दिया मिर्झा, पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या अभिनेत्रींवर लागलाय ‘सावत्र आई’चा टॅग…