Sardar Udham : कतरिना कैफकडून विकी कौशलचं कौतुक, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली…

| Updated on: Oct 16, 2021 | 6:57 PM

विकी कौशलचा चित्रपट सरदार उधम आज OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. प्रत्येकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होता. चाहते आणि बॉलिवूड सेलेब्सनाही हा चित्रपट खूप आवडत आहे. शुक्रवारी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते.

Sardar Udham : कतरिना कैफकडून विकी कौशलचं कौतुक, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...
Katrina-Vicky
Follow us on

मुंबई : विकी कौशलचा चित्रपट सरदार उधम आज OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. प्रत्येकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होता. चाहते आणि बॉलिवूड सेलेब्सनाही हा चित्रपट खूप आवडत आहे. शुक्रवारी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. जिथे अनेक सेलेब्स पोहोचले. त्यापैकी एक होती कतरिना कैफ. कतरिनाने सोशल मीडियावर आता तिचं मत व्यक्त केलं आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशल हे सध्या चर्चेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. पण अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र हे दोघं नेहमीच एकत्र दिसतात. सरदार उधमच्या स्क्रीनिंगमध्ये कतरिना खूप उत्साही दिसत होती. आता तिने चित्रपटाचा एक रिव्ह्यू दिला आहे.

कतरिना कैफने दिला रिव्ह्यू

कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा चित्रपट पाहिल्यानंतर विकीची प्रशंसा केली आहे. सरदार उधमचे पोस्टर शेअर करत तिने लिहिलं – सुजित सरकारचं व्हिजन कमाल आहे. मनमोहक, उत्तम चित्रपट. शुद्ध कथाकथन. विकी कौशल शुद्ध प्रतिभा, प्रामाणिक आणि हृदयद्रावक आहे. यासह, तिने हार्ट इमोजी, हात जोडलेली आणि स्टार इमोजी पोस्ट केली.

सरदार उधम Amazon प्राइम वर रिलीज झाला आहे. प्रत्येकजण चित्रपटाचं कौतुक करत आहेत. हा चित्रपट प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे.

सरदार उधमबद्दल बोलायचं झालं तर, अमोल पराशर, बंडिता संधू, स्टीफन होगन या चित्रपटात विकीसोबत मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केलं आहे.

सरदार उधम

‘सरदार उधम’ मध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तो एका स्वातंत्र्य सेनानीची भूमिका साकारत आहे. Amazon Prime Video वर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटामध्ये विकी कौशल सरदार उधम यांची भूमिका साकारत आहे. ज्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी जनरल डायरला लंडनमध्ये गोळ्या घातल्या होत्या. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत.

‘सरदार उधम’ हा एका स्वातंत्र्य सेनानीचा बायोपिक आहे. सरदार उधम यांच्या जीवनाची कथा या चित्रपटात सांगितली गेली आहे, जी नक्कीच जाणून घेण्यासारखी आणि पाहण्यासारखी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शूजित सरकार आहेत.  ‘सरदार उधम’ हा एक चित्रपट आहे, जो तुम्हाला संपूर्ण वेळ खिळवून ठेवेल. चित्रपटाच्या शेवटच्या तासात तुम्ही जनरल डायरचा तिरस्कार करू लागता. कारण, तुम्ही चित्रपटात इतके रमता की, तुम्हाला ती पात्रे जाणवू लागतात. हा एक पिरीयड बायोपिक आहे जो बॉलिवूडमध्ये बनवलेल्या उर्वरित चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे.

संबंधित बातम्या