OTT Releases: 5 दिवसांत या 4 वेब सीरिज, 2 चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ओटीटीवर वीकेंडला तुम्ही काय पाहणार?

| Updated on: Aug 18, 2022 | 12:20 PM

जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेब शो आणि चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर पुढील 5 दिवसांत 4 नवे वेब सीरिज (Web Series) आणि 2 चित्रपट (Movies) प्रदर्शित होणार आहेत.

OTT Releases: 5 दिवसांत या 4 वेब सीरिज, 2 चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ओटीटीवर वीकेंडला तुम्ही काय पाहणार?
OTT Releases: 5 दिवसांत या 4 वेब सीरिज, 2 चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Image Credit source: Instagram
Follow us on

दर आठवड्याला अनेक नवीन वेब सीरिज आणि चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असतात. जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेब शो आणि चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर पुढील 5 दिवसांत 4 नवे वेब सीरिज (Web Series) आणि 2 चित्रपट (Movies) प्रदर्शित होणार आहेत. हे कोणत्या प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) आणि कधी येणार आणि या आठवड्यात रिलीज होणार्‍या नवीन वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात. या आठवड्यात हिंदीमध्ये फक्त एक वेब सीरिज रिलीज होत आहे. उर्वरित 3 वेब शो इंग्रजी भाषेत आहेत. त्याचबरोबर दोन्ही चित्रपट फक्त इंग्रजीत प्रदर्शित होणार आहेत. रोमँटिक कथेपासून ते अॅनिमेशनपर्यंत आणि बरेच सस्पेन्स-थ्रिलर तुम्हाला पाहायला मिळतील.

1. Royalteen
चित्रपट
कुठे पाहता येईल?- नेटफ्लिक्स
प्रदर्शनाची तारीख- 17 ऑगस्ट

2. The Next 365 Days
चित्रपट
कुठे पाहता येईल?- नेटफ्लिक्स
प्रदर्शनाची तारीख- 19 ऑगस्ट

हे सुद्धा वाचा

3. Tekken: Bloodline
वेब सीरिज
कुठे पाहता येईल?- नेटफ्लिक्स
प्रदर्शनाची तारीख – 18 ऑगस्ट

4. Echoes
वेब सीरिज
कुठे पाहता येईल?-नेटफ्लिक्स
प्रदर्शनाची तारीख 19 ऑगस्ट

5. The Girl in the Mirror
वेब सीरिज
कुठे पाहता येईल?-नेटफ्लिक्स
प्रदर्शनाची तारीख 19 ऑगस्ट

6. दुरंगा
हिंदी वेब सीरिज
कुठे पाहता येईल?- झी 5
प्रदर्शनाची तारीख 19 ऑगस्ट

7. Minus One Season 1
हिंदी वेब सीरिज
कुठे पाहता येईल?- Lionsgate Play
प्रदर्शनाची तारीख 19 ऑगस्ट

ऑगस्ट महिना सिनेप्रेमींसाठी खूप मनोरंजनाचा ठरत आहे. कारण या महिन्यात अनेक चित्रपट आणि सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. जुलै महिन्यात प्रदर्शित झालेले बरेच चित्रपट हे ऑगस्टमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत आहेत. त्यामुळे थिएटरमध्ये एखादा चित्रपट पाहायचा राहिल्यास आता प्रेक्षक ओटीटीवर तो पाहू शकतात.