‘सिक्रेट्स ऑफ कोहिनूर’ सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मनोज बाजपेयी आणि नीरज पांडे उलगडणार कोहिनूर हिऱ्याचे रहस्य

| Updated on: Jul 26, 2022 | 12:15 PM

डिस्कव्हरी प्लसवर वेबसिरीज आणि चित्रपटांमधून वेगळा आणि मनोरंजक कंटेंट पाहायला मिळत आहे. यामुळेच हे अॅप प्रेक्षकांना पसंत पडत आहे. या अॅपवर अलीकडेच मनोरंजक माहितीपट शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सीरियल किलर्सपासून अनेक सीरिजचा समावेश आहे.

सिक्रेट्स ऑफ कोहिनूर सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मनोज बाजपेयी आणि नीरज पांडे उलगडणार कोहिनूर हिऱ्याचे रहस्य
Follow us on

मुंबई : अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) आणि चित्रपट निर्माते नीरज पांडे हे ‘सिक्रेट्स ऑफ कोहिनूर’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहेत. ही एक माहितीपट स्वरूपात बनवलेली सीरिज आहे. नीरज पांडेचा (Neeraj Pandey) हा माहितीपट ‘सिक्रेट्स ऑफ सिनौली: डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरी (2021)’ नंतर रिलीज होणारी सिक्रेट्स फ्रँचायझीमधील दुसरी सीरिज असणार आहे. कोहिनूरबद्दल (Kohinoor) अनेक खुलासे करणारी ही सीरिज आहे. या सीरिजबद्दल बोलताना नीरज पांडे यांनी एक खास गोष्ट शेअर केलीयं.

इथे पाहा सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेली पोस्ट

सीरिजबद्दल नीरज पांडे म्हणाले की…

नीरज पांडे म्हणाले की, “सिक्रेट्स ऑफ सिनौलीच्या जबरदस्त यशानंतर, मी ‘सिक्रेट्स’ फ्रँचायझीसाठी ‘सिक्रेट्स ऑफ द कोहिनूर’ डिस्कवरी+ आणि मनोज यांच्यासोबत नवीन सीरिज घेऊन येत आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे की ही सीरिज प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी होईल. कोहिनूरशी संबंधित स्टोरी प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करतात. जगातील हा सर्वात मौल्यवान हिरा 13व्या शतकात गोलकोंडा खाणीतून काढण्यात आला होता.

डिस्कव्हरी प्लसवर वेबसिरीज रिलीज होणार

डिस्कव्हरी प्लसवर वेबसिरीज आणि चित्रपटांमधून वेगळा आणि मनोरंजक कंटेंट पाहायला मिळत आहे. यामुळेच हे अॅप प्रेक्षकांना पसंत पडत आहे. या अॅपवर अलीकडेच मनोरंजक माहितीपट शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सीरियल किलर्सपासून अनेक सीरिजचा समावेश आहे. डिस्कव्हरी प्लसवर पोस्ट करण्यात आलेल्या रामायण मालिकेला देशातच नाही तर परदेशातही पसंती मिळाली. सिक्रेट्स ऑफ कोहिनूर आता काय कमाल करणार हे बघण्यासारखे ठरणार आहे.