मुंबई : अॅमेझॉन प्राईमवर विद्या बालनचा (Vidya Balan) ‘शेरनी’ (Sherni) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विद्या वनविभागाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तिचे चाहते बर्याच दिवसांपासून विद्याच्या या चित्रपटाची वाट पाहत होते आणि आता हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देत आहेत (Sherni Twitter Review Amazon Prime video Vidya Balan Movie released).
आतापर्यंत आलेल्या प्रतिक्रियांमध्ये प्रत्येकजण चित्रपटाची कहाणी आणि विद्याच्या अभिनयाचे कौतुक करत आहे. ही व्यक्तिरेख साकारल्यानंतर त्यांच्या मनात विद्याबद्दलचा आदर अधिक वाढला आहे, अशी चाहत्यांचीही प्रतिक्रिया आहे. आपणदेखील चित्रपट पाहण्याची योजना आखत असाल, तर प्रेक्षकांच्या या प्रतिक्रिया नक्कीच वाचा.
#Sherni – Every forest officer and officials involved with protecting the forests in india should watch the movie atleast once. Lot of lessons and slaps on the system that has killed the forests and the wild life in it.
Much respect @vidya_balan for doning the female lead !!
— Prashanth Rangaswamy (@itisprashanth) June 17, 2021
For Me… #Sherni is an Amazing film… Realistic to the core, shows mirror to our society, and at the same time brings out the dark side of Politics and bureaucracy…#VidyaBalan & #VijayRaaz has done a phenomenal work, kudos to director and team… 3.5*/5 ⭐️⭐️⭐️? #SherniReview pic.twitter.com/6KWI3SdYul
— Rohit Jaiswal (@rohitjswl01) June 18, 2021
Still watching, but what a movie so far. Take a bow Vidya Balan, Vijay Raaz and the entire cast of #Sherni along with Amit Masurkar’s brilliant direction. ?
You wouldn’t want to miss this one. ? pic.twitter.com/fVhEw0GLK1
— Sanjana Sharma (@_keysarasara) June 17, 2021
One of a Kind ! ✨#Sherni pic.twitter.com/SY37IWYpbk
— Kavya Reddy (@kavya_reddy01) June 17, 2021
Just saw #Sherni simply outstanding film. Arguably the best hindi film of the year so far. @vidya_balan @Amitmasurkar brilliant absolutely brilliant
— Mayur Lookhar (@mayurlookhar) June 17, 2021
चित्रपटात विद्या वन अधिकार्यांची भूमिका साकारत असून, वाघ मनुष्यभक्षी का बनत आहे, हे शोधून काढणार आहे. टी-सीरिज आणि अमुनदानतिया एंटरटेन्मेंट निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘न्यूटन’ फेम दिग्दर्शक अमित मसुरकर यांनी केले आहे. या चित्रपटात विद्याशिवाय शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राज, इला अरुण मुख्य भूमिकेत दिसत आहेत.
अमितने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, विद्या ही शेरनीसाठी सर्वात पहिली पसंती होती आणि तिच्या संपर्क साधल्यावर लवकरच ती या चित्रपटात सामील झाली. वन विभागात महिला वनरक्षक, अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी अशा अनेक पदांवर काम करतात. विद्या बालनला अशी अभिनेत्री आहे की, या पात्रात येण्यासाठी तिला जास्त वेळ लागला नाही.
चित्रपटामध्ये काम करताना येणाऱ्या अडचणींबद्दल सांगताना ते म्हणाले होते की, ‘चित्रपटाची कथा 2019 मध्ये लिहिली गेली होती आणि डिसेंबरमध्ये आम्ही प्री-प्रॉडक्शन काम सुरू केलं. 2020मध्ये आम्ही भोपाळजवळ शूट केले. कोरोनामुळे होणार्या अडचणी लक्षात येताच, आम्ही लॉकडाऊनच्या आधी काम बंद केले आणि प्रत्येकजण आपापल्या घरी गेला.’
अमित पुढे म्हणाले होते की, ‘जेव्हा आम्ही ऑक्टोबर 2020मध्ये पुन्हा भेटलो, तेव्हा कोरोनाचे अतिशय कडक प्रोटोकॉल होते. चित्रपटाच्या निर्मात्याने कोरोना लक्षात ठेवून बायो बबलमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. त्यात आमचे बहुतेक शूटिंग जंगलात झाले असल्याने, आम्ही सुरक्षित आणि गर्दीपासून दूर होतो. शूट दरम्यान आम्ही पीपीई कीट आणि फेस मास्क परिधान केले होते. शूटनंतर कलाकार त्वरित मास्क घालायचे. अशा परिस्थितीत काम करणे कठीण होते, परंतु प्रत्येकाची सुरक्षासुद्धा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण होती.’
(Sherni Twitter Review Amazon Prime video Vidya Balan Movie released)
Vidya Balan Net Worth | घर, गाड्या आणि पैसे, पाहा ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे ‘शेरनी’ विद्या बालन!