मुंबई : कॉमेडियन वीर दासच्या (Vir Das) ‘I Come From Two Indias’ व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. काही लोकांनी त्याला समर्थन दिले, तर काही त्याच्या विरोधात देखील बोलले. त्याच्याविरोधात दिल्ली आणि मुंबईतील पोलिस ठाण्यातही तक्रारी दाखल करण्यात आल्या.
वीर दास याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर 6 मिनिटांचा एक व्हिडीओ शेअर केला. वॉशिंग्टन डी.सी.मधील जॉन एफ. केनेडी सेंटरमधील अमेरिकेतील त्याच्या एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. यामध्ये वीर दासने एकव स्वरचित कविता वाचून दाखवली, ज्याचे शीर्षक होते – ‘I come from two Indias’ म्हणजेच ‘मी दोन भारतातून आलोय.’
व्हिडीओमध्ये त्याने भारतातील विरोधाभास लोकांसमोर मांडला आहे. हा व्हिडीओ समोर येताच अवघ्या काही तासांत सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांनी अवघ्या इंटरनेटविश्वाला देखील दोन गटात विभागले. या गोष्टी उघडपणे बोलल्याबद्दल अनेक लोक वीर दासचे कौतुक करत आहेत, तर अनेक लोक त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप करत आहेत. पण वीर दास वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही… याआधीदेखील वीर दास अनेक वादात अडकला आहे. चला तर, जाणून घेऊया असे कोणते वाद आहेत ज्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला…
कोरोनाच्या काळात वीर त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘टेन ऑन टेन’ नावाची कॉमेडी सीरीज करत होता. या मालिकेच्या एका भागात त्याने ट्रान्सजेंडर समुदायावर काही विनोद केले. मात्र, या जोक्सच्या मदतीने तो सरकारवर ताशेरे ओढत होते. पण लोक म्हणाले की, ते विनोद ट्रान्सजेंडर समुदायाची चेष्टा करत आहेत. त्याच्या एका चाहत्याने वीरला इन्स्टाग्रामवर मेसेज करून याबद्दल सांगितले देखील होते. वीर आणि त्याच्या फॅन्समध्ये संवाद झाला, तोपर्यंत ही गोष्ट खूप वाढली होती. सोशल मीडियावर वीर ट्रोल होऊ लागला होता. आपल्या चाहत्याच्या मेसेजला उत्तर दिल्यानंतर वीरने एक पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी आपली चूक मान्य करत बिनशर्त माफी देखील मागितली होती.
मे 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान, वीरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये त्याचे वृद्ध शेजारी त्याच्याजवळ शिंकताना दिसले. यासोबतच त्यांनी वीर दास याला थप्पड मारेन असेही म्हटले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर लोक वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलू लागले. यानंतर वीरने हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्याने सांगितले की, तो तळमजल्यावर राहतो. पहिल्या मजल्यावर एक 73 वर्षांचे वृद्ध राहतात. साथीच्या आजाराच्या काळात वीरने आपल्या कॉम्प्लेक्समधील काही लोकांसाठी जेवण बनवले होते. ते लोक 15 फूट दूर होते. यादरम्यान त्यांच्यापैकी एकाने धुम्रपान करण्यासाठी मास्क खाली केला. वीर त्याच्या घराच्या दारात उभा होता आणि त्याने मास्क घातलेला नव्हता.
हे पाहून पहिल्या मजल्यावरचे ते काका चिडले. तो वीरवर शिंकू लागले. यासोबतच त्याला थप्पड मारण्याची आणि मीडियाकडे जाण्याची धमकीही द्यायला लागले. वीरने त्यांचा व्हिडीओ बनवून त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला आहे. या घटनेने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. लोक आपापल्या राजकीय पटलाप्रमाणे या विषयावर आपली मते व्यक्त करू लागले. पण नंतर दोन दिवसांनी वीरने अधिकाऱ्यांचे आणि त्याच्या चाहत्यांचे पाठिंब्याबद्दल आभार मानले. तसेच प्रकरण निकाली काढण्यात आल्याचे देखील सांगितले.
जानेवारी 2021 मध्ये कॉमेडियन लिली सिंग, वीर दास याच्यासोबत तिचा शो ‘अ लिटिल लेट विथ लिली सिंग’मध्ये बोलत होती. या संवादात वीर दास याने त्याच्याशी संबंधित एक प्रसंग सांगितला. वीर सांगतो की, एकदा तो दिल्लीत एक शो करत होता. यावेळी त्याने राजकीय खिल्ली उडवली, जी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याशी संबंधित होती. प्रेक्षकात बसलेल्या कोणाला तरी तो विनोद आक्षेपार्ह वाटला. शोमध्ये बसलेल्या व्यक्तीने पोलिसांना बोलावले. काही वेळातच 45 पोलीस वीर परफॉर्म करत असलेल्या स्टेडियममध्ये पोहोचले. त्यानंतर कसेबसे ते प्रकरण मिटवले गेले.
काही काळापूर्वी नेटफ्लिक्स स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर वीर दासची एक वेब सीरीज आली होती. या सीरीजचे नाव होते ‘हसमुख’. ही मुळात एका कॉमेडियनची कथा होती, जो स्टेजवर परफॉर्म करायला जाण्यापूर्वी कोणाचा तरी खून करायचा. या मालिकेचे प्रोमोज समोर येताच, एका वकिलाने केस दाखल केली होती. या मालिकेच्या प्रदर्शनाला न्यायालयाने स्थगिती द्यावी, असे ते म्हणाले होते. कारण या मालिकेत वकिलांचे चुकीच्या पद्धतीने चित्रण केले जात होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने या शोच्या प्रसारणावर बंदी घालण्यास सपेशल नकार दिला होता.
2016 मध्ये वीर दास आणि सनी लिओनीचा ‘मस्तीजादे’ चित्रपट आला होता. हा चित्रपट एक प्रौढ कॉमेडी होता, ज्याची खुद्द वीर दास देखील खिल्ली उडवतो. हा चित्रपट आला आणि वीर दास-सनी लिओनीवर एफआयआर दाखल झाला. दिल्लीतील आदर्श नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करणाऱ्या एका व्यक्तीला चित्रपटातील एका दृश्यावर आक्षेप होता. चित्रपटातील एक दृश्य, ज्यामध्ये वीर आणि सनी मंदिरात अश्लील पद्धतीने कंडोमची जाहिरात करताना दिसत आहेत. ही गोष्ट विशिष्ट धर्माच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे, असे म्हटले गेले होते.
Aai Kuthe Kay Karte| ‘आईचा मित्र कधी असूच शकत नाही!’, अभिषेकही जाणार अरुंधतीच्या विरोधात