मुंबई : लोकप्रिय राजकीय ड्रामा ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ (City of Dreams 2 ) ही वेब सीरीज सीझन 2सह ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री फ्लोरा सैनीने रात्री उशिरा याची पुष्टी केली की, ‘सिटी ऑफ ड्रीम्स सीझन 2’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘कू’वर याचे पोस्टर शेअर करतांना फ्लोराने लिहिले की, ‘गायकवाडांमध्ये आणखी एका युद्धाला सुरुवात होईल’? कोण जिंकेल? बाप, मुलगी की राज्य?’ यासोबतच तिने हे देखील सांगितले की, यावेळी सीझन 2मध्ये अभिनेत्री प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसतील आणि त्यांच्यात मोठा लढा दाखवला जाईल.
दुसरीकडे अभिनेत्री प्रिया बापटने देखील या वेबसीरीजचा ट्रेलर शेअर केला आहे. वेब सीरीजच्या या सीझनमध्ये लेक आणि वडिलांमध्ये सत्तेचा खेळ कसा रंगतो? हे दाखवण्यात येणार आहे. सत्तेच्या लालसेपुढे सर्व नाती छोटी असतात. एखादा राजकारणी याच लालसेपोटी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो आणि त्याची मुलगी देखील त्याला कशी जोरदार टक्कर देते, हे या सीरीजमध्ये दाखवलं जाणार आहे.
‘सीरिज सिटी ऑफ ड्रीम्स’ सीझन 1च्या शेवटी, या राजकीय पार्टीची भव्य बैठक पहिली होती. जगदीश दिल्लीसाठी योजना आखतो आणि त्याचा मार्ग मोकळा करून घेतो. दरम्यान, पौर्णिमाला हल्ल्याबद्दल माहिती मिळते. त्यामुळे सीझन 1मध्ये शिल्लक राहिलेली ही कहाणी सीझन 2 मध्येही सुरू राहील. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन 13 मे 2019 रोजी प्रदर्शित झाला.
या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटसोबतच सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, देवस दीक्षित, विकास केणी, संदीप कुलकर्णी असे अनेक दिग्गज मराठी कलाकार झळकणार आहेत. मराठी कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ही सीरीज प्रचंड गाजली होती. आता दुसऱ्या सीझनचा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्कंठा कमालीची वाढली आहे.
‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही मालिका नागेश कुन्नूर यांनी दिग्दर्शित केली होती. रोहित बनवलीकर आणि नागेश कुकनूर यांनी सहलेखन केले होते. ही एक राजकीय ड्रामा सीरीज आहे, ज्याच्या आगामी भागाची प्रतीक्षा प्रेक्षकांना गेल्या वर्षी डिसेंबरपासून होती. पण कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शूटिंग थांबवण्यात आले होते. सीझन 1ला लोकांना चांगला प्रतिसाद मिळाला होता.
(The second season of City of Dreams 2 is coming soon on Hotstar)
Binge Watch : रोमँटिक-विनोदी चित्रपट पाहून कंटाळलायत? मग, ओटीटीवर या 5 फॅन्टसी सीरीज नक्की पाहा!
Samantar 2 | ‘समांतर 2’ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद, अवघ्या 15 दिवसांत 56 दशलक्षहूनही अधिक व्ह्यूज!