मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एकता कपूरची (Ekta Kapoor) वेब सीरिज XXX सीजन 2 वादाच्या भोवऱ्यात अडकलीये. या वेब सीरिजच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या वेब सीरिज प्रकरणात एकता कपूरला चांगलेच फटकारले आहे. तुम्ही देशातील तरुणांचे डोके खराब करत असल्याचे म्हटले आहे. यामुळे एकताच्या अडचणींमध्ये वाढ झालीये. टीव्ही क्वीन म्हणून एकताने स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागिन सारख्या फेमस मालिकांमधून गेल्या कित्येक वर्षांपासून एकता प्रेक्षकांचे मनोरंजन (Entertainment) करत आहे. मात्र, एकताची बेव सीरिज वादात सापडलीये.
XXX सीजन 2 मध्ये देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाबद्दल चुकीचे दाखवण्यात आले असून सैनिकांच्या पत्नींचा अपमान या सीरिजमध्ये केलाय, असा आरोप सातत्याने केला जातोय. या प्रकरणात सुनावणी करताना न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, नक्कीच काही तरी केले पाहिजे…तुम्ही देशातील तरुण पिढीचे डोके खराब करत आहात…तुम्ही लोकांना कोणते पर्याय देत आहात?
एकता कपूरच्या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या सीन्सविरोधात माजी सैनिक संघटना थेट न्यायालयात गेलीये. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी एकता कपूरच्या नावाने अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते. XXX सीजन 1 प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. मात्र, XXX सीजन 2 वादात सापडले असून हा वाद आता थेट कोर्टात सुरू आहे. यामध्येच आता न्यायालयाने देखील एकता कपूरला फटकारले आहे.