Shark Tank India 3 : शार्क टँक इंडिया या भारतात देखील आता चांगलाच लोकप्रिय टीव्ही शो बनला आहे. पहिले 2 सीझन खूप गाजले. त्यानंतर आता प्रेक्षकांना तिसऱ्या सीजनची उत्सुकता लागून राहिली आहे. तिसऱ्या सीजनची प्रतिक्षा संपली असून हा शो २२ जानेवारीला OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. शार्क टँक इंडिया 3 ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
22 जानेवारी 2024 पासून हा शो सुरू होणार आहे. हा शो सोनी लाइव्ह अॅपवर प्रसारित होईल. शोच्या नवीन प्रोमोसह सोनी लिव्ह अॅपने ट्विट करून ही माहिती दिली आहे.
या व्हिडिओ प्रोमोमध्ये एक तरुण दिसत आहे जो आपली कॉर्पोरेट नोकरी सोडून स्टार्टअप सुरु करतो. त्याचे सर्व मित्र त्याला निरोप देत आहेत. प्रोमोच्या शेवटी तो तरुण शार्क टँकमध्ये येतो. त्याच्या व्यवसायाची कल्पना मांडतो.
शार्क टँकचा हा सीझनही खूप रोमांचक ठरणार आहे. कारण या शोमध्ये आता आणखी काही शार्क दिसणार आहेत. अमन गुप्ता, अनुपम मित्तल, नमिता थापर, विनिता सिंग, अमित जैन आणि पियुष बन्सल यांच्यासह अनेक नवीन उद्योजक तिसऱ्या सीजनमध्ये दिसणार आहेत.
Shark Tank India Season 3, streaming from 22nd January on Sony LIV.#SharkTankIndiaSeason3OnSonyLIV #SharkTankIndia#SharkTankIndiaOnSonyLIV#Corporate #CorporateLife #Job #StartUp #Business #Funding #Investment pic.twitter.com/5xkDYMnMMt
— Sony LIV (@SonyLIV) December 22, 2023
ओयो रूम्सचे मालक रितेश अग्रवाल, झोमॅटोचे मालक दीपेंद्र गोयास, इनशॉर्ट्सचे सीईओ अझहर इक्बाल, एडलवाइज म्युच्युअल फंडाच्या सीईओ राधिका गुप्ता, ACKO चे संस्थापक वरुण दुआ आणि UPgrad चे सह-संस्थापक राणी स्क्रूवाला यांचा समावेश आहे.
शार्क टँक इंडिया’ हा शो डिसेंबर २०२० मध्ये लाँच करण्यात आला होता. लॉन्च झाल्यानंतरच तो चांगलाच गाजला. स्टार्ट-अप आणि उद्योजक यांना मोठी संधी मिळू लागली. भारतात या शोला प्रेक्षकांनी देखील डोक्यावर उचलून घेतले. 2022 मध्ये दुसरा सीजन आल्यानंतर तो देखील चांगलाच चर्चेत राहिला. आता याचा तिसरा सीजन देखील आगमनासाठी तयार आहे.