बिग बॉस मराठी 5 तूफान धमाका करताना दिसतंय. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझही बघायला मिळतंय. अभिनेता रितेश देशमुख या सीजला होस्ट करताना दिसतोय. मागच्या आठवड्यात थेट रितेश देशमुख याच्यासमोरच घरातील काही स्पर्धेक वाद करताना दिसले. अंकिता ही बिग बॉसच्या घराची कॅप्टन झाली आहे. बिग बॉसने घरातील सदस्यांना टास्कही दिले आहेत. मात्र, या टास्कमध्ये घरातील सदस्य एकमेकांच्या अंगावर जाताना दिसले. आता आज रितेश देशमुख त्याच्यावरूनच घरातील सदस्यांचा क्लास लावताना दिसणार आहे. बिग बॉस मराठी 5 च्या घरात जोरदार हंगामा बघायला मिळतोय.
बिग बॉस मराठीच्या सुरूवातीच्या आठवड्यांमध्ये निकी तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये जोरदार वाद बघायला मिळाला. हेच नाही तर यावरून निकी तांबोळीचा रितेश देशमुख याच्याकडून जोरदार क्लास देखील लावण्यात आला. निकी तांबोळी आणि वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात दोघी एकमेकींना टोमणे मारताना कायमच दिसतात.
आता दुसरीकडे निकी तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये जरी वाद होत नसेल तरीही वर्षा उसगांवकर आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकरमध्ये जोरदार भांडणे झाल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर एकमेकींवर जोरदार टीका करताना दिसल्या. अगदी छोट्या कारणामुळे दोघींमध्ये भांडणे सुरू होतात.
वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली की, तुम्हाला कारण नसताना दुसऱ्यांच्यामध्ये करण्याची सवय आहे. विषय कोणताही असो तुम्हाला त्यामध्ये पडायचेच आहे. यावेळी वर्षा उसगांवकर या देखील जान्हवीला चांगलेच भांडताना दिसल्या. दुसऱ्यांच्या तालावर नाचत असल्याचा गंभीर आरोपही करताना वर्षा उसगांवकर दिसल्या.
वर्षा उसगांवकर खरोखरच दुसऱ्यांच्या विषयामध्ये कारण नसताना पडत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. हेच नाही तर बिग बॉसच्या घरात नागिन डान्स करतानाही वर्षा उसगांवकर या दिसल्या आहेत. वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत त्यांनी महत्वाच्या भूमिका देखील केल्या आहेत.