मुंबई : विपुल अमृतलाल शाह आणि झी स्टूडियोजचा बहुप्रतीक्षित चित्रपट, ‘सनक – होप अंडर सीज’ भारतातील सर्वात मोठ्या प्रीमियम ओटीटी मंचावर प्रदर्शित होणार आहे. कनिष्क वर्माद्वारे दिग्दर्शित, विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) आणि बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा अभिनित हा चित्रपट लवकरच ‘डिज्नी+ हॉटस्टार मल्टीप्लेक्स’वर प्रदर्शित होणार आहे. या घोषणेसोबतच, चित्रपट निर्मात्यांनी एक नवे आकर्षक पोस्टरचे देखील अनावरण केले आहे, ज्यामध्ये विद्युत हातामध्ये बंदूक घेऊन मिशनसाठी सज्ज झाला आहे.
विपुल शाह यांनी, सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडसोबत अनेक उत्तम सिनेमांसोबत दर्शकांचे मनोरंजन केले आहे. या वेळी झी स्टूडियोजच्या सहयोगाने, त्यांचे प्रोडक्शन ‘सनक – होप अंडर सीज’ या धमाकेदार अॅक्शनपटासोबत सज्ज झाले आहेत.
अभिनेता विद्युत जामवालचा निर्माता विपुल शाह यांच्यासोबत हा 5वा चित्रपट आहे. काही महिन्यांआधी आलेल्या ‘सनक’च्या आकर्षक पोस्टरने दर्शकांची मने जिंकली होती आणि आजच्या या नव्या पोस्टरने दर्शकांना उत्सुक केले आहे, कारण ते आता पुढे येणाऱ्या रोमांचक ट्विस्टची वाट बघत आहेत.
विद्युत जामवाल, चंदन रॉय सान्याल, नेहा धूपिया आणि या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये डेब्यु करणारी बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा अभिनीत, ‘सनक – होप अंडर सीज’ झी स्टूडियोजद्वारे सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडच्या सहयोगाने प्रस्तुत करण्यात येत आहे. हा विपुल अमृतलाल शाह प्रोडक्शनचा चित्रपट असून याचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा यांनी केले आहे. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात येणार आहे.
विद्युत जामवालने नुकतेच नंदिता मेहतानीशी साखरपुडा केला आहे. त्याच्या या हटके शैलीवर संपूर्ण माध्यमांमध्ये बातम्या देखील होत्या, कारण भारतातील मार्शल आर्ट्सचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्युत जामवाल यांनी नंदिताला अनोख्या पद्धतीने अंगठी घातली होती.
ओटीटी प्लॅटफॉर्म आजच्या काळात सामान्य माणसाच्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे. वेब सीरीज असो किंवा ओटीटीवर रिलीज झालेले चित्रपट असो, लोकांमध्ये त्याबद्दल खूप क्रेझ आहे. याआधी बहुतेक वेब सीरीज ओटीटीवर पाहिल्या गेल्या होत्या, पण कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवरच अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. 50 टक्के चित्रपटगृहे उघडल्यानंतरही निर्माते त्यांच्या चित्रपटांशी कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत.
कोरोना युगानंतर, ओटीटीचे माध्यम लोकांसाठी मनोरंजनाचे प्रमुख साधन बनले आहे. गेल्या काही वर्षांपासून नेटफ्लिक्स, Amazon प्राइम, हॉटस्टारसारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरीज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणत्याही प्रकारची कमतरता नाही.
KBC 13 | अमिताभ बच्चनच्या ‘केबीसी 13’ला मिळणार दुसरा करोडपती, प्रांशू जिंकेल का 1 कोटींचं बक्षीस?