मुंबई : बॉलिवूडमध्ये आजकाल दिग्दर्शक बायोपिक बनवण्यावर जास्ती भर देत आहेत. या वर्षी अनेक धमाकेदार बायोपिक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. बायोपिक चित्रपटांमुळे लोक एकमेकांशी लवकर जोडले जातात. अशा परिस्थितीत या वर्षी कोणते बायोपिक रिलीज झाले ते जाणून घेऊया…
‘थलायवी’मध्ये जे. जयललिता यांचा अभिनेत्री – राजकारणी असा जीवनपट दाखवला आहे. चित्रपटात जे. जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणात येण्याचा प्रवास दाखवला आहे. हा चित्रपट 10 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला होता. ए. एल विजय यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, या चित्रपटात कंगना रनौतने जे जयललिता यांची भूमिका साकारली आहे.
सचिन तेंडुलकरप्रमाणेच सायना नेहवाल ही देखील एक अशी खेळाडू आहे, जिने तरुण पिढीला खेळाची जाणीव करून दिली आहे. सायनाची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. तिच्यावर बनवलेल्या बायोपिकचे नाव ‘सायना’ असून त्यात परिणीती चोप्राने मुख्य भूमिका साकारली आहे. या अभिनेत्रीने सायनाची व्यक्तिरेखा पडद्यावर उत्तमरित्या साकारली आहे. हा चित्रपट Amazon Prime वर 26 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ता यांनी केले होते.
‘सरदार उधम’ हा या वर्षातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत होता. सरदार उधम हा स्वातंत्र्य सेनानी सरदार उधम सिंह यांचा बायोपिक आहे. त्यांची देशभक्ती या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
शेरशाह हा देखील देशभक्तीपर चित्रपट आहे. या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्रा यांचे देशप्रेम आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रेम दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्रांची भूमिका साकारली आहे. त्याच वेळी, त्यांची गर्लफ्रेंड डिंपल चीमाची भूमिका अभिनेत्री कियारा अडवाणीने साकारली आहे.
‘द बिग बुल’ हा स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांच्या जीवनावर आधारित फायनान्स थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन हर्षद मेहताची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत इलियान डिक्रूझ, राम कपूर, सौरभ शुक्ला यांच्यासह अनेक कलाकार होते. कोरोनामुळे चित्रपटगृहांऐवजी डिस्ने हॉट स्टारवर प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट 8 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित झाला.
Year Ender 2021 | ‘अन्नाथे’पासून ते ‘मास्टरपर्यंत, साऊथच्या ‘या’ चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर कल्ला!