नवी दिल्ली : कपिल शर्मा शो व बिग बॉस हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहेत. या शो मध्ये सहभागी होण्याच अनेकांच स्वप्न असतं. या दोन पैकी एका शो ची ऑफर मिळणं, ही कुठल्याही मोठ्या कलाकारासाठी सुद्धा मानाची गोष्ट असते. पण तुम्हाला ऑफर आली आणि तुम्ही नकार दिलात, तर तुम्ही काय म्हणाल?. आम्ही पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरबद्दल बोलतोय. सीमा हैदरला या दोन्ही शो ची ऑफर मिळालीय. पण तिने सध्या नकार दिलाय. पण तिने या शो ची ऑफर पूर्णपणे फेटाळून सुद्धा लावलेली नाही. सीमा हैदरने स्वत:च या गोष्टीबद्दल माहिती दिलीय. तिने सांगितलं की, कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी तिला आणि तिचा नवरा सचिन मीणाला ऑफर मिळाली होती. त्या दोघांना मुंबईला बोलवण्यात आलं होतं.
अशाच प्रकारे त्यांना सलमान खानचा बहुचर्चित शो बिग बॉसची ऑफर मिळाली होती. सीमाने सांगितल की, सध्या या कुठल्याही शो मध्ये सहभागी होण्याचा प्लान नाहीय. जेव्हा कधी असा प्लान होईल, तेव्हा जरुर तुम्हाला सांगीन, असं सीमा म्हणाली. सीमा हैदरने हे वक्तव्य केल्यानंतर तिचे वकिल एपी सिंह यांनी सुद्धा व्हिडिओव्दारे वक्तव्य केलय. कायदेशीर दृष्ट्या कुठल्याही शो मध्ये सहभागी होणं सीमासाठी योग्य ठरणार नाही. सीमाची सध्या चौकशी सुरु आहे असं तिच्या वकीलाने सांगितलं. सरकारी संस्थांकडून तपास सुरु आहे.
जय श्रीरामच्या घोषणेने सुरुवात
तपास संपल्यानंतर अशा कुठल्याही शो किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याचा विचार केला जाईल. या संबंधात मी सचिन आणि सीमाशी बोललोय असं तिचे वकील एपी सिंह यांनी सांगितलं. सीमा हैदरने व्हिडिओची सुरुवात जय श्रीरामच्या घोषणेने केली. तिने हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा सुद्धा दिल्या. पाकिस्तानातून आलेल्या सीमाने इस्लाम सोडून मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आहे. सीमा हिंदू धर्माचे विविध सण हिंदू परंपरेनुसार साजरे करत आहे. ती व्रत ठेवतेय. देवांच्या फोटोंची पूजा करते. चांद्रयान-3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगसाठी तिने व्रत ठेवलं होतं. सीमा हैदर भारतात आल्यानंतर सतत माध्यमांना मुलाखती देऊन प्रसिद्धीच्या झोतात होती. आता या दोन मोठ्या शो च्या रुपाने संधी मिळत असताना तिने दिलेल्या उत्तराने सगळेच चक्रावून गेलेत.