नाही म्हणजे नाहीच… पाकिस्तानी कलाकार महाराष्ट्रात नकोच, मनसे पुन्हा आक्रमक; काय दिला इशारा?

| Updated on: Sep 21, 2024 | 2:14 PM

mns on pakistani actors: पाकिस्तानी कलाकार महाराष्ट्रात नकोच... पाकिस्तानी कलाकार आणि सिनेमांवर मनसे पुन्हा आक्रमक, काय दिला इशारा?

नाही म्हणजे नाहीच... पाकिस्तानी कलाकार महाराष्ट्रात नकोच, मनसे पुन्हा आक्रमक; काय दिला इशारा?
Follow us on

गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करण्यास बंदी आहे. पाकिस्तानचे अनेक कलाकारंनी बॉलिवूडमध्ये काम करत स्वत: ओळख निर्माण केली. पण गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानी कलाकार बॉलिवूडपासून दूर आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत, असं मनसेनं पुन्हा एकदा खडसावून सांगितलं आहे.

पाकिस्तान चित्रपट आणि कलाकाराला महाराष्ट्रात काम करु देणार नाही… असं वक्तव्य मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलं आहे. ‘पाकिस्तान चित्रपट आणि कलाकाराला महाराष्ट्रात काम करु देणार नाही… त्यांचा सिनेमा प्रदर्शीत करु देणार नाही… आम्ही हा विषय घेऊन आंदोलन करतो आहे…’

पुढे खोपकर म्हणाले, ‘पाकिस्तानी सिनेमा आहे, त्यांना तो संपूर्ण हिंदुस्तानात प्रदर्शीत करायचा आहे. सर्व थिएटरला आम्ही काय सांगायचं आहे ते आम्ही सांगितलं आहे. आपल्याला गरज काय आहे पाकिस्तानची? असा प्रश्न देखील खोपकर यांनी उपस्थित केला.

‘आपल्याकडे कलाकारांची कमी आहे का… तुम्ही आमच्यावर हल्ले करणार आणि आम्ही इकडे पाकिस्तानचे कलाकार जोपासायचे? काय करावं लागेल ते आम्ही करु…’ असा इशारा मनसेने दिला आहे.

2016 मध्ये झालेला दहशतवादी हल्ला

2016 मध्ये झालेल्या उरी दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले. 2016 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून पाकिस्तानी कलाकार बॉलिवूडपासून दूर आहेत.

इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनने ‘सुरक्षा’ आणि ‘देशभक्ती’चं कारण देत नियम बनवला होता की ते सीमापार कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी देणार नाहीत. यानंतर फवाद खान, माहिरा खान, अली जफर, राहत फतेह अली खान यांसारख्या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये बराच काळ काम केलं नाही.