नवी दिल्ली | 26 जानेवारी 2024 : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक आणि पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद यांच्या लग्नामुळे एक वादळ निर्माण झालंय. त्या दोघांच्या लग्नामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये एकच खळबळ माजली. त्याचे कारण म्हणजे शोएब याची दुसरी पत्नी सानिया मिर्झा ही भारताची टेनिस सुपरस्टार आहे. पण, लग्नानंतर ते दुबईमध्ये रहात होते. शोएब याने सनासोबत विवाह केल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे सर्वत्र शोएब मलिक आणि सना यांच्याच लग्नाची चर्चा सुरु आहे.
शोएब आणि सना यांच्या लग्नानंतर काही मनोरंजक बातम्या समोर आल्या होत्या. शोएब आणि सानिया यांच्या घटस्फोटानंतर अनेकांनी टीका केली तर अनेकांनी शोएबला पाठिबा दिलाय. तर, सोशल मीडियावर लोकांनी मलिक आणि सना या दोघांवर आपापले लग्न मोडल्याची टीका केली आहे. काहींनी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब याला घटस्फोट देण्याच्या सानियाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
शोएब याचे हे तिसरे लग्न आहे. 2002 मध्ये आयेशासोबत त्याचे पहिले लग्न झाले. त्यानंतर शोएब याने दुसरं लग्न सानिया मिर्झा हिच्यासोबत केलं. लग्नानंतर दोघे दुबई याठिकाणी राहात होते. शोएब आणि सानिया यांना पाच वर्षांचा मुलगा आहे. तर अभिनेत्री सना जावेद हिचे हे दुसरे लग्न आहे.
शोएब आणि सना जावेद यांच्या लग्नानंतर आता एकेक माहिती समोर येत आहे. शोएब मलिक आणि सना जावेद यांचे गेल्या ३ वर्षांपासून अफेअर होते? असा दावा पाकिस्तानी मीडियाने केला आहे. विवाहित असूनही मलिक आणि सना यांचे गेल्या तीन वर्षांपासून अफेअर होते. त्यांच्यात घनिष्ट संबंध निर्माण झाले होते असा दावा पाकिस्तानी मीडियाने केलाय.
शोएब मलिक याला जेव्हा चॅनलवर शोसाठी बोलावले जायचे तेव्हा ते फक्त सनाला बोलावले पाहिजे या अटीवर यायचे अशी माहिती पाकिस्तानी मीडियाने दिलीय. गेल्या तीन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते आणि ते एकमेकांच्या खूप जवळ आले होते. सना जावेद हिचा पती उमैर याला याबद्दल माहिती नव्हती. परंतु, सानिया मिर्झा आणि तिच्या कुटुंबाला, अगदी मलिक याच्या कुटुंबालाही गेल्यावर्षी याची माहिती मिळाली होती. परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न केले गेले पण मलिक यांनी कोणाचेही ऐकले नाही.” असा दावाही मिडीयाने केलाय. विशेष म्हणजे, सना जावेद हिने अवघ्या तीन महिन्यापूर्वीच पती उमेर जसवाल याच्यापासून घटस्फोट घेतला होता.