सलमान, शाहरुख यांच्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना धमकी, पाकिस्तानी डॉन म्हणाला…

| Updated on: Nov 11, 2024 | 1:39 PM

Mithun Chakraborty: माफी मागितली नाही तर, पश्चाताप होईल... पाकिस्तानी डॉनने दिली मिथुन चक्रवर्ती यांना धमकी, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मिथुन चक्रवर्ती यांची चर्चा...

सलमान, शाहरुख यांच्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना धमकी, पाकिस्तानी डॉन म्हणाला...
Follow us on

Mithun Chakraborty: अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरुख खान यांच्यानंतर ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना धमकी मिळाली आहे. पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टी याने धमकी दिली आहे. 15 दिवसांमध्ये माफी मागितली नाही तर, पश्चाताप कारावा लागेल…. भट्टी याने दुबईतून व्हिडीओ जारी केला आहे. व्हिडीओमध्ये भट्टी, मिथुन चक्रवर्ती यांच्याबद्दल वाईट बोलताना देखील दिसत आहे.

सांगायचं झालं तर, कोलकाता येथील एका रॅली दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हा गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. रॅलीमध्ये मिथुन चक्रवर्ती म्हणाले होते, ‘येथील 70 टक्के लोकसंख्या मुसलमान आहे… एका नेत्याने हिंदूंची कत्तल करून भागीरथीमध्ये त्यांना टाकलं जाईल, असे सांगितले होते. असं असेल तर आम्ही तुमची कत्तल करू पण आम्ही तुम्हाला नदीत सोडणार नाही तर, तुमच्या जमीनीत दफन करु…’

 

 

यावर पाकिस्तानी डॉन म्हणाला, ‘व्हिडीओ मिथुन यांचा आहे. काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते मुसलमानांना गाडू त्यांना दफन करू… मिथुन साहेब एक सल्ला देतो 15 दिवसांमध्ये माफी मागा नाही तर, पश्चाताप करावा लागेल…’ मिथुन चक्रवर्ती यांना धमकी आल्यामुळे चाहते देखील चिंतेत आहेत.

भट्टी पुढे म्हणाला, ‘तुमच्या चाहत्यांमध्ये मुसलमान देखील आहेत. मुस्लिम बांधवांनी तुम्हाला आदर दिला आणि तुम्ही त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. तुमचे फ्लॉप सिनेमा पाहण्यासाठी देखील आम्ही चित्रपटगृहात जातो. तुमचं जे वय आहे या वयात असं वक्तव्य तुम्हाला शोभा देत नाही…त्यामुळे तुम्हाला फक्त पश्चातापच करावा लागेल…’ घडलेल्या प्रकरणामुळे सध्या वातावरण तापलं आहे.

कोण आहे शहजाद भट्टी?

शहजाद भट्टी पाकिस्तानी डॉन आहे. शहजाद भट्टी हा पाकिस्तानचा कुख्यात गुंड फारूख खोखरचा उजवा हात आहे. शिलाय गुडं लॉरेन्स बिष्णोई याच्यासोबत देखील शहजाद भट्टी याचे जवळचे संबंध आहेत. संपूर्ण बॉलिवूड लॉरेन्सच्या निशाण्यावर आहे. तर ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ देखील करण्यात आली आहे.