मुंबई : ‘पनामा पेपर्स लीक’ (Panama Papers leak case ) प्रकरणात आता बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी ईडीने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) हिला समन्स पाठवले आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणी ईडीने ऐश्वर्या रायला हे समन्स बजावले आहे. ज्या अंतर्गत तिला आता दिल्लीत बोलावण्यात आले आहे.
मात्र, नव्या माहितीनुसार, अभिनेत्रीने आता स्थगिती मागितली आहे, जी एजन्सीने स्वीकारली आहे. त्यानुसार आता तिला हजर होण्यासाठी नवीन तारीख दिली जाण्याची शक्यता आहे.
पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचे नावही समोर आले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाचे एचआययू या प्रकरणाची चौकशी करत आहे.
पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. यामध्ये देशातील नेते, चित्रपट अभिनेते, खेळाडू, उद्योगपती, प्रत्येक वर्गातील नामवंत व्यक्तींची नावे आहेत. या सर्व लोकांवर करचुकवेगिरीचा आरोप आहे. ज्याच्या मदतीने एजन्सी आता आपले काम करत आहे.
पनामा पेपर्स प्रकरणाचा तपास बराच काळ सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासात देशातील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश केला आहे. महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चनही ईडी कार्यालयात पोहोचला होता. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना काही कागदपत्रेही दिली आहेत. ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच त्यांचे वडील अमिताभ बच्चन यांनाही या प्रकरणी ईडी नोटीस देऊन बोलावणार आहे.
2016 मध्ये, यूकेमध्ये पनामा-आधारित लॉ फर्मचे 11.5 कोटी कर दस्तऐवज लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. भारतीयांबद्दल बोलायचे झाले तर, जवळपास 500 जणांची नावे समोर आली आहेत. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश आहे. एका रिपोर्टनुसार, यात अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते. यापैकी तीन बहामामध्ये, तर, एक व्हर्जिन आयलंडमध्ये होती. 1993 मध्ये या कंपनी तयार केल्या गेल्या. या कंपन्यांचे भांडवल 5 हजार ते 50 हजार डॉलर्स दरम्यान होते. परंतु, या कंपन्या त्या जहाजांचा व्यवसाय करत होत्या, ज्याची किंमत कोट्यावधी होती.
ऐश्वर्याला यापूर्वी एका कंपनीची डायरेक्टर बनवण्यात आले होते. नंतर त्यांना कंपनीचे भागधारक म्हणून घोषित करण्यात आले. कंपनीचे नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड होते. त्याचे मुख्यालय व्हर्जिन बेटांवर होते. ऐश्वर्याशिवाय वडील के. राय, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील त्यांचे कंपनीत भागीदार होते. ही कंपनी 2005 मध्ये स्थापन झाली. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच 2008 मध्ये ही कंपनी बंद पडली.
Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?
Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!