झगमगत्या विश्वात यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अभिनेत्रींना अनेक चांगल्या – वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो. ‘पंचायत’ फेम अभिनेत्री आंचल तिवारी हिला देखील इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना धक्कादायक परिस्थितीचा सामना करावा लागला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्रीला आलेला अनुभव अत्यंत धक्कादायक होता. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.
आंचल तिवारी म्हणाली, ‘करिअरच्या सुरुवातील मला मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. पण त्या बदल्यात निर्माते, दिग्दर्शकांनी माझ्याकडून विचित्र मागणी केली. मला तडजोड करण्यासाठी सांगण्यात आवं. तेव्हा मी मुंबईत नवीन होती. मला अनेक गोष्टी कळत देखील नव्हत्या… कॉम्प्रोमाइज म्हणजे काय करायचं… याचा अर्थ देखील मला कळत नव्हता…’
‘जेव्हा मला सांगण्यात आलं मालिकेसाठी तुझी निवड करण्यात आली आहे. तेव्हा दुसऱ्या दिवशी मी कॉन्ट्रॅक्ट साइन करण्यासाठी जाणार होती. सर्वकाही ठरलं होतं. त्यानंतर मला एक मेसेज आला… तुला तडजोड करावी लागेल… सर्वकाही ठरलं, त्यांना तू आवडली आहेस. पण तुला कॉम्प्रोमाइज करावं लागेल… मला याचा अर्थ देखील कळत नव्हता… अशात मी माझ्या मैत्रिणींना विचारलं…’
‘वास्तव माझ्या समोर आल्यानंतर मी मालिकेसाठी स्पष्ट नकार दिला. अशी घटना माझ्यासोबत पहिल्यांदा झाली होती. मी खूप रडली… अखेर माझ्या मैत्रिणीने मला समजावलं. मुंबईमध्ये असं होत असतं… असं देखील माझी मैत्रिण मला म्हणाली. आपल्यावर जेव्हा प्रसंग ओढावतो, तेव्हा आपल्याला परिस्थिती कळते…’
‘तेव्हा मला कळालं आपल्या अटींवर काम करणं प्रचंड कठीण आहे. मला असं कोणतंही काम करायचं नाही, ज्यामुळे मी स्वतः आनंदी नसेल. तुला बॉडी दाखवावी लागले… असे ऑफर देखील मला आहे… पण अशा भूमिका करण्यासाठी तयार नाही. पंचायतमध्ये काम केल्यानंतर माझ्याकडे दुसरी कोणतीच ऑफर नाही.’ असं देखील आंचल म्हणाली.
सध्या सर्वत्र ‘पंचायत 3’ वेब सीरिजची चर्चा रंगली आहे. सीरिजच्या पहिल्या दोन सीझनला प्रेम दिल्यानंतर, तिसऱ्या सीझनने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर देखील सीरिजचे शॉर्ट व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.