Panchayat fame Aasif Khan Marriage: सध्या झगमगत्या विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पार्टनरसोबत लग्न केलं आहे. ‘पंचायत’ फेम दामाद जी म्हणजे अभिनेता आसिफ खान देखील लग्नबंधनात अडकला आहे. ‘पंचायत’ सीरिजमध्ये आसिफ याने गणेश या भूमिकेला न्याय दिला. चाहत्यांनी देखील अभिनेत्याला डोक्यावर घेतलं. आता असिफ त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आसिफ याने गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. सध्या अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
33 वर्षीय आसिफ खान याने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेता बायकोवर प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. लग्नात आसिफ याने क्रिम रंगाची शेरवानी आणि पघडी घातली होती. तर अभिनेत्याच्या पत्नीने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत आसिफ याने कॅप्शनमध्ये ‘कबूल है…’ असं लिहिलं आहे.
सध्या आसिफ याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. 10 डिसेंबर रोजी आसिफ याचं लग्न पार पडलं आहे. फोटोंवर फक्त चाहत्यांनीच नाही तर, सेलिब्रिटींनी देखील लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री मौनी रॉय शुभेच्छा देत म्हणाली, ‘तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा… सॉरी मी येऊ शकली नाही…’ सुयेश रॉय कमेंट करत म्हणाला, ‘मुबारक हो भाई…’
एका मुलाखतीत आसिफ याने आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं होतं. करियरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अभिनेता हॉटेलमध्ये काम करायचा… त्याच हॉटेलमध्ये अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान याने 2012 मध्ये लग्न केलं होतं. त्यावेळी आसिफ याने मॅनेजरला बॉलीवूड सेलिब्रिटींना भेटण्याची परवानगी देण्यास सांगितलं होतं. पण त्याने स्पष्ट नकार दिला. त्या दिवशी अभिनेता खूप रडला.
अखेर आसिफ याने 2011 मध्ये अभिनयास सुरुवात केली. अभिनेत्याने ‘रेड्डी’ सिनेमात ज्यूनियर अभिनेत्याची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर अभिनेता ‘अग्निपथ’, ‘परी’, ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’, ‘पगलॅट’, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ आणि ‘काकुड़ा’ सिनेमात दिसला. आसिफ याने अनेक वेबसीरिजमध्ये देखील काम केलं आहे. ‘मिर्झापूर’, ‘जामतारा’, ‘पंचायत’, ‘पाताल लोक’, ‘मिर्झापूर 2’ या वेब सीरिजमध्ये देखील दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.