मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : लैंगिक शिक्षणाबद्दल आता अनेक ठिकाणाहून ऐकायला येत. शाळेत, घरात मुलांना लैंगिक शिक्षणाचे धडे द्यायला हवे.. असं अनेकदा सांगण्यात येत. नुकताच अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी देखील लैंगिक शिक्षणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र पंकज त्रिवाठी आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा रंगत आहे. पंकज त्रिपाठी लवकरच ‘ओएमजी २’ सिनेमाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सिनेमा लैंगिक लैंगिक शिक्षणावर आधारलेला आहे. लैंगिक शिक्षणाचे धडे मुलांना देणं किती महत्त्वाचं आहे.. याबद्दल सिनेमात सांगण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहेत…
अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी तुमच्या मुलीला कधी लैंगिक शिक्षणाचे धडे दिले आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला.. यावर पंकज त्रिपाठी म्हणाले, ‘आपल्या समाजात कोणी लैंगिक संबंधांवर चर्चा करत नाहीत. ही फार चुकीची गोष्ट आहे. मुलांसाठी लैंगिक शिक्षण फार महत्त्वाचं आहे…’
पुढे अभिनेते म्हणाले, ‘सांगायचं झालं भारतीय कुटुंबांमध्ये लैंगिक शिक्षणाबद्दल कोणी बोलत नाही. पण हे योग्य नाही. मुलांसोबत बोलणं फार महत्त्वाचं आहे. मी माझ्या मुलीसोबत लैंगिक संबंधांबद्दल बोलत असतो. आम्ही मित्र आहोत… मी मित्र म्हणून मुलीला लैंगिक शिक्षणाचे धडे देत असतो. काय चूक आहे आणि काय बरोबर आहे.. हे सांगणं फार महत्त्वाचं आहे…’ असं देखील पंकज त्रिपाठी म्हणाले आहे.
पंकज त्रिपाठी सध्या आगामी ‘ओएमजी २’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. सिनेमात अभिनेता अक्षय कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत होते. आज सिनेमा देखील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात गर्दी करतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ११ ऑगस्ट रोजी सनी देओल याच्या ‘गदर २’ सिनेमासोबत, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘ओएमजी २’ सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. दोन्ही सिनेमे दमदार असल्यामुळे कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.