मुंबई : ‘लेडीज वर्सेज रिकी बहल’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला असताना परिणीती हिचं मुंबई येथील घर नव्या नवरीप्रमाणे सजवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिणीती आणि राघव चड्ढा १३ मे रोजी दिल्ली याठिकाणी साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांची जोर धरला आहे. पण अद्यापही दोघांनी देखील नात्याचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे परिणीती आणि राघव चड्ढा सर्वांसमोर कधी नात्याचा स्वीकार करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर परिणीती हिच्या भव्य घराचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये अभिनेत्रीच्या घरात साखरपुड्याची तयारी सुरु असल्याचं दिसून येत आहे. परिणीती हिचं घर मुंबई येथील वांद्रे याठिकाणी आहे. अभिनेत्रीच्या सजवलेल्या घराचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी परिणीतीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Parineeti Chopra Engagement)
एवढंच नाही तर अभिनेत्रीच्या कपड्यांबद्दल देखील मोठी माहिती समोर येत आहे. रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीला प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याच्या घरी स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा पासून लग्नसोहळ्यात अभिनेत्री मनिष मल्होत्राने डिझाइन केलेले कपडे घालणार असल्याच्या चर्चा रंगत आहे.
परिणीती हिला आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत एका हॉटेल बाहेर स्पॉट करण्यात आलं. त्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. आता असलेल्या नात्याला परिणीती आणि राघव कधी दुजोरा देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोघांनी अद्याप नात्यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
परिणीतीला हॉटेलबाहेर खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत स्पॉट केल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding)
मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती – राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झालं असलं तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरलं. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचं शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झालं असं सांगण्यात येत आहे.