मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे दिल्लीमध्ये अत्यंत शाही थाटात लग्न झाले. विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कुटुंबियांसोबत पोहचले. आता नुकताच राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांच्या पहिल्याच दिवाळीचे खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा दोघेही एकदम जबरदस्त लूकमध्ये दिसले.
लग्नानंतरची राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची ही पहिलीच दिवाळी आहे. परिणीती चोप्रा ही सध्या दिल्लीमध्ये असून चड्ढा कुटुंबियांसोबत खास वेळ घालवताना दिसत आहे. परिणीती चोप्रा आणि अक्षय कुमार यांचा रिलीज झालेला चित्रपट फ्लाॅप गेलाय. या चित्रपटाचे काही खास प्रमोशन करताना परिणीती चोप्रा ही मुळात दिसलीच नव्हती.
परिणीती चोप्रा आणि ही चड्ढा कुटुंबियांसोबत सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे करताना दिसतंय. काही दिवसांपूर्वीच परिणीती चोप्रा हिने करवा चाैथचे खास फोटो शेअर केले होते. आता दिवाळी देखील परिणीती चोप्रा धमाकेदार पद्धतीने साजरी करताना दिसतंय. विशेष म्हणजे फोटोंमध्ये परिणीती चोप्रा ही रोमँटिक होताना दिसत दिसत आहेत.
एका फोटोमध्ये परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याची किस घेताना दिसत आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची पहिली भेट ही विदेशात झाली. अनेक वर्षे यांनी एकमेकांना डेट केले. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे मुंबईमध्ये अनकेदा स्पाॅट होताना दिसले. मात्र, त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अनेक वर्षे सर्वांपासून लपवून ठेवले होते.
विशेष म्हणजे अत्यंत शाही पद्धतीने उदयपूरला यांचा शाही विवाह सोहळा हा पार पडला. दिल्लीमध्ये त्यांचा साखरपुडा झाला. काही दिवसांपूर्वीच परिणीती चोप्रा ही मुंबईमध्ये दाखल झाली. मात्र, लगेचच परत ती दिल्लीला रवाना झाली. चाहते परिणीती चोप्रा हिला चित्रपटात पाहण्यास इच्छुक आहेत. मात्र, परिणीती चोप्रा हिने लग्नानंतर अद्याप तिच्या चित्रपटांच्या शूटिंगला सुरूवात केली नाहीये.