मुंबई : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनमुळे जोरदार चर्चेत आहेत. विशेष म्हणजे दिल्ली येथे काही दिवसांपूर्वीच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा हा पार पडलाय. अत्यंत कमी आणि खास लोकांच्या उपस्थित यांचा साखरपुडा झाला. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही देखील उपस्थित होती.
बहिणीचे सर्व कर्तव्य साखरपुड्यात पार पाडताना प्रियांका चोप्रा ही दिसली होती. याचे अनेक फोटो व्हायरल झाले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही लंडनमध्ये झाली. अगोदर मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर थेट प्रेमात झाले. अनेक वर्षे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी एकमेकांना डेट करून लग्नाचा निर्णय घेतला.
साखरपुड्याच्या अगोदर बऱ्याच वेळा परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना मुंबईमध्ये स्पाॅट केले गेले होते. साखरपुड्याच्या अगोदरच कधीच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे त्यांच्या नात्याबद्दल भाष्य करताना दिसले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून चाहते हे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.
आता नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे आले आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न राजस्थानमध्ये पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर लग्नाची तयारी देखील जोरदार सुरू आहे. एका रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न 25 सप्टेंबरला होणार आहे.
त्यापूर्वी संगीत आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे साखरपुड्याप्रमाणेच अत्यंत शाही पद्धतीने यांचे लग्न पार पडणार आहे. लग्नाची तयारी देखील सुरू आहे. नुकताच परिणीती चोप्रा हिने एक खास व्हिडीओ हा सोशल मीडियावर शेअर केला होता. परिणीती चोप्रा हिने शेअर केलेला व्हिडीओ मालदीवमधील आहे. सुट्टयामध्ये धमाल करताना परिणीती चोप्रा ही दिसत आहे.
परिणीती चोप्रा हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मालदीवमध्ये सायकल चालवताना परिणीती चोप्रा ही दिसत होती. त्यानंतर बीचवर देखील मस्त आराम करताना परिणीती चोप्रा ही दिसली. परिणीती चोप्रा हिने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. चाहत्यांनी या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट देखील केल्या आहेत.