मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्या नात्याबद्दल सध्या अनेक चर्चा रंगत आहेत. अभिनेत्री खासदार राघव चड्ढा यांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. परिणीती – राघव लग्नबंधनात अडकणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. पण यावर अद्याप परिणीती – राघव यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. परिणीतीला हॉटेलबाहेर खासदार राघव चड्ढा यांच्यासबत स्पॉट केल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. सध्या सर्वत्र परिणीती चोप्रा आणि रघाव चड्ढा यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.
पण खासदार राघव चड्ढा यांच्याआधी देखील अभिनेत्रीच्या आयुष्यात खास व्यक्ती होती. २०१७ मध्ये परिणीती चोप्रा आणि असिस्टेंट दिग्दर्शक चरित देसाई याच्या नात्याने चाहत्यांचं लक्ष वेधलं. पण अभिनेत्रीने कधीही त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही, पण ब्रेकअपबद्दल मोठं वक्तव्य केलं. (Parineeti Chopra love story)
एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘माझं एक प्रचंड वाईट ब्रेकअप झालं आहे. तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण होता. कारण याआधी मी कधीही रिजेक्शनचा सामना केला नव्हता. या दरम्यान मी खचली होती. तेव्हा मला फक्त आणि फक्त माझे कुटुंबिय आणि मित्रांचा आधार होता. पण मी आता आनंदी आहे.’
पुढे अभिनेत्री म्हणली, ‘मी या गोष्टीचा अनुभव आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर घेतला आणि ज्यामुळे मला प्रचंड मदत झाली. त्या ब्रेकअपसाठी मी देवाचे आभार मानेल… त्या घटनेनंतर माझ्यात अनेक सकारात्मक बदल झाले….’ आज परिणीती बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती – राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झालं असलं तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरलं. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचं शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झालं असं सांगण्यात येत आहे.
पण दोघांच्या नात्याला किती वर्ष पूर्ण झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण रिपोर्टनुसार त्यांच्या नात्याला ६ महिने झाले असून दोघांची लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचली आहे. तर यावर परिणीती – राघव कधी स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. (Parineeti Chopra – Raghav Chadha)