मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सध्या पंजाबचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. परिणीती आणि राघव यांचं शिक्षण एकाच कॉलेजमध्ये झालं. पण परिणीतीबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री बॉलिवूडमधील सर्वात जास्त शिकलेली अभिनेत्री आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी परिणीती बँकिंग क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रयत्न करत होती. वयाच्या १७ व्या वर्षी परिणीती शिक्षणासाठी लंडनमध्ये गेली होती. पण बँकिंग क्षेत्रात करियर न करता परिणीतीने अभिनयात स्वतःची ओळख निर्माण केली.
परिणीती फक्त अभिनयातच नाही तर, अभ्यासामध्ये देखील प्रचंड हुशार आहे. परदेशात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परिणीतीने नोकरी देखील केली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. परिणीतीने कॉन्वेंट ऑफ जीसस एन्ड मेरी शाळेतून शिक्षण घेतलं आहे. परिणीतीने बिझनेस, फायनेन्स आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये डिॉग्री मिळवली आहे.
परिणीतीने एकदा इन्स्टाग्रामवर ‘Ask Me A Question’ सेशनच्या माध्यामातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तेव्हा एका चाहत्याने अभिनेत्रीला विचारलं, ‘बारावीत किती टक्के मिळाले होते?’ यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी १२वी कॉमर्समध्ये ऑल इंडिया टॉपर्सच्या यादीत होती.’ बारावीत असताना परिणीती हिला अर्थशास्त्र विषयात ९७ टक्के गुण मिळाले होते.
खासदार असण्यासोबतच राघव चड्ढा दिल्ली जज बोर्डाचे उप-अध्यक्ष देखील आहेत. राघव चड्ढा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेत सीएचं शिक्षण घेतलं. याआधी राघव यांनी बाराखंबा रोडच्या मॉर्डन स्कूलमधून शिक्षण घेतलं. दिल्ली विश्वविद्यालयातून राघव यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. राघव चड्ढा यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्यां वडिलांचं नाव सुनील चड्ढा आणि आईचं नाव अल्का चड्ढा असं आहे.
सध्या सर्वत्र राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे. शिवाय एप्रिल महिन्यात दोघे साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. परिणीतीला हॉटेलबाहेर खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत स्पॉट केल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. पण दोघांनी त्यांच्या नात्यावर मौन बाळगलं आहे.