parineeti chopra raghav chadha : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी 24 सप्टेंबर 2023 मध्ये शाही थाटत लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. परिणीती – राघव यांच्या लग्नात कुटुंबिय आणि मित्रपरिवार उपस्थित होते. पंजाबी पद्धतीत परिणीती – राघव यांचा विवाह संपन्न झाला. उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये परिणीती – राघव यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सध्या इंटरनेटवर परिणीती – राघव यांच्या लग्नाचा नवा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये परिणीती – राघव यांच्या लग्नातील खास क्षण कैद करण्यात आले आहेत. परिणीती हिने स्वतःच्या आवाजात पती राघव यांच्यासाठी गाणं गायलं आहे. अभिनेत्रीने गायलेलं ‘ओ पिया’ गाणं चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे. सोशल मीडियावर सध्या परिणीती – राघव यांच्या लग्नाच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
3 मिनिटे 53 सेकंदांच्या या म्युझिक व्हिडिओमध्ये परिणीती – राघव यांच्या हळदी, मेहेंदीपासून ते प्री-वेडिंग आणि लग्नापर्यंतचे अनेक न पाहिलेले क्षण पाहायला मिळत आहेत. व्हिडिओमध्ये त्याच्या बॅचलर पार्टीचे खास क्षणही हायलाइट करण्यात आले आहेत. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत…
खुद्द परिणीती हिने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘त्यांना माझ्याकडून भेट…आणि आता संपूर्ण जग…’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र परिणीती – राघव यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम तिच्या आयुष्यातील खास क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते…
परिणीती कायम पतीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट प्रेम व्यक्त करत असते. राघव चड्ढा देखील पत्नीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. परिणीती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
परिणीती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर परिणीती हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.