मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा यांचा 13 मे रोजी दिल्ली येथे साखरपुडा पार पडलाय. साखरपुड्याच्या अगोदर बरीच वर्ष परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे एकमेकांना डेट करत होते. सर्वात अगोदर यांना मुंबईमध्ये स्पाॅट केले गेले. त्यानंतर बऱ्याच वेळा हे विमानतळावर देखील स्पाॅट झाले. मात्र, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी त्यांच्या नात्यावर भाष्य करणे नेहमीच टाळले होते. बरीच वर्ष डेट केल्यानंतर यांचा आता साखरपुडा पार पडला असून आॅक्टोबर महिन्यात यांचे लग्न होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ (Video) हे सोशल मीडियावर व्हायरल झाले.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा अत्यंत राॅयल पध्दतीने साखरपुडा हा पार पडलाय. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी साखरपुड्याचे काही खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे अत्यंत जबरदस्त लूकमध्ये दिसत होते. यांच्या साखरपुड्यातील एक खास व्हिडीओही तूफान व्हायरल होताना दिसला.
या व्हिडीओमध्ये लिपलाॅक करताना परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दिसले. अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा हा पार पडलाय. राघव चड्ढा याचे शिक्षण दिल्ली येथे झाले असून राघव चड्ढा हा आम आदमी पार्टीचा खासदार आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही लंडन येथे झाली.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राघव चड्ढा याने त्याचा आवडला पदार्थ आणि आवडत्या चित्रपटाबद्दल देखील सांगितले होते. राघव चड्ढा हा पंजाबी कुटुंबातील आहे. मात्र, त्याला पंजाबी पदार्थांपेक्षी अधिक चायनीज पदार्थ खाण्यासाठी आवडतात. दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे हा राघव चड्ढा याचा आवडचा चित्रपट आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुडयाला प्रियांका चोप्रा हिने देखील हजेरी लावली होती. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला राजकिय नेते, बाॅलिवूडमधील काही खास लोक यांनी हजेरी लावली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री हे देखील परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यासाठी उपस्थित होते. चाहते आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.