मुंबई : परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा यांचे लग्न काही दिवसांपूर्वीच अत्यंत शाही पद्धतीने उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये पार पडले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या लग्नाला अत्यंत खास लोक उपस्थित राहिले. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील उपस्थित राहिले. यासोबतच पंजाबचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही विदेशात झाली. मुंबईमध्ये अनेकदा एकसोबत स्पाॅट होताना परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दिसले. मात्र, यांनी नेहमीच त्यांच्या नात्यावर भाष्य करणे टाळले.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. इतकेच नाही तर लग्नाच्या एकदिवस अगोदर आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत खास धमाल करताना परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दिसले. अत्यंत शाही पद्धतीने यांचे लग्न झाले.
लग्नानंतर काही दिवसांपूर्वीच परिणीती चोप्रा ही मुंबईत दाखल झाली. लग्नानंतर दिल्लीमध्ये चड्ढा कुटुंबासोबत चांगला वेळ घालवताना परिणीती चोप्रा दिसली. आता नुकताच परिणीती चोप्रा हिने एक अत्यंत खास असा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा ही सध्या मालदीवमध्ये धमाल करताना दिसतंय.
परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याच्यासोबत नाही तर एका खास व्यक्तीसोबत मालदीवमध्ये धमाल करताना दिसतंय. होय याचा खुलासा स्वत: परिणीती चोप्रा हिने केलाय. परिणीती चोप्रा हिने एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये परिणीती चोप्रा हिचा जबरदस्त असा लूक दिसतोय. या फोटोमध्ये स्विमिंग पूलमध्ये परिणीती चोप्रा दिसतंय.
हा फोटो शेअर करत परिणीती चोप्रा हिने लिहिले की, हनिमूनवर नाहीये, फोटो ननंदने क्लिक केलाय. म्हणजेच काय तर परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याच्या बहिणीसोबत मालदीवला गेलीये. परिणीती चोप्रा हिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसतंय. चाहते हे परिणीती चोप्रा हिच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.