Video | लग्नानंतर परिणीती चोप्रा दिसली जबरदस्त लूकमध्ये, अभिनेत्री मुंबईत दाखल

| Updated on: Oct 12, 2023 | 6:47 PM

परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न उदयपूरमध्ये अत्यंत शाही पद्धतीने पार पडले. परिणीती चोप्रा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Video | लग्नानंतर परिणीती चोप्रा दिसली जबरदस्त लूकमध्ये, अभिनेत्री मुंबईत दाखल
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शाही विवाह सोहळा हा काही दिवसांपूर्वीच उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये पार पडलाय. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ (Video) हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. इतकेच नाही तर लग्नाच्या अगोदर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा धमाका करताना दिसले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा सध्या चांगलेच चर्चेत आहे.

लग्नानंतर परिणीती चोप्रा ही चड्ढा कुटुंबियांसोबत खास वेळ घालवताना दिसली. परिणीती चोप्रा हिचे चड्ढा कुटुंबात खास स्वागत देखील करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच परिणीती चोप्रा हिने एक अत्यंत खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याच्या घरी काय काम करत आहे हे दिसत होते.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे अनेकदा स्पाॅट होताना देखील दिसले. मात्र, यांनी कधीच त्यांच्या नात्यावर काही भाष्य केले नाही. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही विदेशात झाली. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी लग्नात कोट्यवधी रूपये खर्च केले.

परिणीती चोप्रा ही नुकताच आता लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईमध्ये दाखल झालीये. विशेष म्हणजे नव्या नवरीचा एक ग्लो परिणीती चोप्रा हिच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला. परिणीती चोप्रा हिने हातामध्ये चुडा आणि सिंदूर भरलेला दिला. काळ्या रंगाच्या टीशर्टवर परिणीती चोप्रा हिचा जबरदस्त असा लूक बघायला मिळाला.

परिणीती चोप्रा हिच्या या लूकचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. यामध्ये परिणीती चोप्रा हिचा जबरदस्त असा लूक बघायला मिळाला. परिणीती चोप्रा आणि अक्षय कुमार यांचा काही दिवसांपूर्वीच मिशन रानीगंज हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अक्षय कुमार दिसला. मिशन रानीगंज चित्रपटाला काही खास धमाका करता आला नाही.