Pathaan: ॲडव्हान्स बुकिंग सुरू होताच हाऊसफुल झाले थिएटर्स; शाहरुख-दीपिकाच्या ‘पठाण’चा नवा विक्रम

| Updated on: Jan 01, 2023 | 9:18 AM

भगव्या बिकिनीच्या वादानंतरही 'पठाण'ची ॲडव्हान्स बुकिंग हाऊसफुल! 'किंग' खान करणार धमाकेदार कमबॅक?

Pathaan: ॲडव्हान्स बुकिंग सुरू होताच हाऊसफुल झाले थिएटर्स; शाहरुख-दीपिकाच्या पठाणचा नवा विक्रम
Pathaan
Image Credit source: Twitter
Follow us on

बर्लिन: बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. 2018 मध्ये त्याचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याने चित्रपटांपासून मोठा ब्रेक घेतला. मध्यंतरीच्या काळात तो ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला. आता आगामी ‘पठाण’ या चित्रपटातून तो धमाकेदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातील एका दृश्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे हा वाद निर्माण झाला. एकीकडे देशात या चित्रपटावरून वाद सुरू असताना दुसरीकडे पठाणची जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंग झाली आहे.

जर्मनी या देशात पठाण चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. भारतात ‘पठाण’विरोधात बहिष्कारची मागणी केली जात असताना जर्मनीत मात्र ॲडव्हान्स बुकिंगची सर्व तिकिटं विकली गेली आहेत. जर्मनीत 28 डिसेंबर रोजी ‘पठाण’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली होती. आतापर्यंत पहिल्या दिवसाची सर्व तिकिटं विकली गेल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

बर्लिन, एसेन, डॅमटोर, हार्गर्ब, हनोवर, म्युनिख आणि ऑफनबॅक इथले सात थिएटर्स ओपनिंग डेसाठी हाऊसफुल झाले आहेत. भारतासोबतच जर्मनीतही पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहता प्रेक्षकांमध्ये शाहरुखच्या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता असल्याचं कळतंय.

पठाण या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या समितीने निर्मात्यांना या चित्रपटात काही बदल सुचवले आहेत. यात पठाणमधील वादग्रस्त ठरलेल्या ‘बेशरम रंग’ या गाण्याचाही समावेश आहे. त्यामुळे बेशरम रंग या गाण्यातील ज्या भगव्या बिकिनीवरून वाद झाला होता, ते बदलणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.