Pathaan Box Office Collection : अभिनेता शाहरुख खान स्टारर पठाण सिनेमा फक्त भारतामध्येच नाही तर, परदेशातही अनोखे विक्रम रचत आहे. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ सिनेमाने फक्त तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने इतिहास रचला. बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पठाण सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तगडी कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशीचे आकडे समोर आल्यानंतर सिनेमा २०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याचं समोर आलं आहे. तिसऱ्या दिवशी सिनेमाचा वेग मंदावल्याचं दिसून आलं.
तिसऱ्या दिवशी भारतात सिनेमाची कमाई समाधान कारक असली तरी, जगभरात मात्र सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली आहे. ट्रेड विश्लेषक रमेश बाल यांनी भारतात होत असलेली सिनेमाची कमाई आणि परदेशात होत असलेल्या सिनेमाच्या कमाईचे आकडे सांगितले आहेत. सध्या पठाण सिनेमाचा डंका भारतासह परदेशातही वाजताना दिसत आहे.
#Pathaan Day 3 All-India Early estimates is ₹ 34 to 36 Crs Nett..
— Ramesh Bala (@rameshlaus) January 28, 2023
रमेश बाला यांच्या ट्विटनुसार तिसऱ्या दिवशी पठाण सिनेमाने ३४ ते ३६ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने ५७ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाने ७०.५ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. पठाण सिनेमा रोज नवे विक्रम रचत आहे. शाहरुख खानचा हा सर्वात हीट सिनेमा ठरला आहे. स्टार्सपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळेच शाहरुखच्या सिनेमाचं कौतुक करत आहेत.
#Pathaan crosses ₹ 300 Crs Gross at the WW Box office in 3 days..
— Ramesh Bala (@rameshlaus) January 28, 2023
जगभरात मात्र सिनेमा तुफान कमाई करताना दिसत आहे. ट्रेड विश्लेषक रमेश बाल यांच्या ट्विटनुसार तीन दिवसात पठाण सिनेमाने जगभरात ३०० कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. बॉक्स ऑफिसवर पठाण सिनेमाची दमदार कमाई सर्व रेकॉर्ड मोडताना दिसत आहे. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा आहे. आता शनिवार आणि रविवार असल्यामुळे ३०० कोटी रुपयांनंतर सिनेमा किती कोट्यवधी रुपयांची कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बुधवारी पठाण सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला, सलग तीन दिवस पठाण सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंज करण्यात यशस्वी ठरत आहे. भारतात तीन दिवसांत सिनेमाने जवळपास १६० कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. शाहरुख खान याच्या पठाण सिनेमाने अनेक हीट सिनेमांचा रोकॉर्ड ब्रेक केल्यामुळे पठाण किती कोटी रुपयांचा गल्ला गोळा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.