सुशांत राजपूत याच्या कुटुंबाच्या अडचणी…, दिवंगत अभिनेता, त्याच्या कुटुंबाबद्दल अंकिता लोखंडे हिचं मोठं वक्तव्य

| Updated on: Apr 20, 2024 | 7:46 AM

Ankita Lokhande | सुशांत सिंह राजपूत याला अद्यापही विसरु शकली नाही अंकिता लोखंडे, दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबियांबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडे हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा... आता असं काय बोलून गेली अभिनेत्री?

सुशांत राजपूत याच्या कुटुंबाच्या अडचणी..., दिवंगत अभिनेता, त्याच्या कुटुंबाबद्दल अंकिता लोखंडे हिचं मोठं वक्तव्य
Follow us on

अभिनेत्री अंकिता लोखंडे कायम एक्स-बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याबद्दल वक्तव्य करत असते. आता देखील अंकिता हिने सुशांत आणि त्याच्या कुटुंबियांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर देखील अंकिता हिचे सुशांत याच्या कुटुंबियांसोबत चांगले संबंध आहेत. अभिनेत्रीचं सुशांत याचे वडील, बहीण श्वेता सिंह हिच्यासोबत देखील चांगले संबंध आहेत. ‘सुशांत याचे कुटुंबिय त्रासात आहेत…’ एवढंच नाही तर, यावेळी अभिनेत्रीने सुशांत याला न्याय मिळायला हवा… असं देखील वक्तव्य केलं. जाणून घेऊ नक्की काय म्हणाली आहे अंकिता लोखंडे…

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अंकिता लोखंडे म्हणाली, ‘मी सुशांत याचं कुटुंब, बहीण श्वेता यांच्यासोबत बोलत असते. कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यासाठी ही गोष्टी प्रचंड कठीण आहे. त्यांची सध्या काय परिस्थिती आहे मला माहिती आहे. त्यांना मदत मिळायला हवी… मला पूर्ण विश्वास आहे की सुशांत याला न्याय नक्की मिळेल…’ असं अंकिता म्हणाली.

सांगायचं झालं तर, अंकिता कायम सुशांत याच्याबद्दल बोलताना दिसते. ‘बिग बॉस 17’ च्या घरात देखील अभिनेत्री अनेकदा सुशांत याच्याबद्दल बोलताना दिसली. ज्यमुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता बिग बॉस संपल्यानंतर देखील अभिनेत्री सुशांत याच्यासोबत असलेल्या अठवणी ताज्या करताना दिसते. सुशांत याच्या नावाचा वापर फक्त प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी करत असल्याचा आरोप अनेकांनी केला होता..

अंकिता आणि सुशांत यांच्या नात्याची सुरुवात ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून झाली. मालिकेतील दोघांच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं होते. फक्त रिल लाईफमध्ये नाहीतर, रियल लाईफमध्ये देखील दोघांची जोडी चाहत्यांना आवडली होती. दोघांचं नातं लग्नापर्यंत देखील पोहोचलं होतं. पण काही कारणांमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सुशांत सिंग राजपूत याचं निधन

टीव्ही विश्वात स्वतःचं नाव मोठं केल्यानंतर सुशांत याने स्वतःचा मोर्चा बॉलिवूडच्या दिशेने वळवला… अभिनेत्याने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान भक्कम केलं होतं. पण सुशांत याला झगमगत्या विश्वातील स्वतःचं स्थान फार काळ टिकवता आलं नाही. 14 जून 2020 मध्ये अभिनेत्याने वांद्रे येथील राहत्या घरी स्वतःला संपवलं…

अंकिता लोखंडे…

सुशांत याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता हिच्या आयुष्यात विकी जैन याची एन्ट्री झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज अंकिता पती विकी याच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.