मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज आपल्याच जिवंत नाही, पण अभिनेत्याच्या आठवणी आजही चाहत्यांमध्ये कायम आहेत. सुशांत सिंह राजपूत याचे आज अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामागे कारण देखील तसंच आहे, सुशांत याने आजच्याच दिवशी स्वतःला संपवलं होतं. अभिनेत्याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. १४ जून २०२१ रोजी सुशांतने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक गोष्टी समोर आल्या. पण अभिनेत्याने इतका टोकाचा निर्णय का घेतला, हे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत सुशांत याने चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. पण सुशांतने त्याच्या करिअरची सुरुवात मालिकांमधून केली..
‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेला सुशांत याने मालिकेत मानव या भूमिकेला योग्य न्याय दिलं. पण ‘पवित्र रिश्ता’ मालिकेआधी देखील अभिनेत्याने एका लोकप्रिय मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील मानवची भूमिका साकारल्यानंतर सुशांत घराघरात प्रसिद्ध झाला. मात्र, ‘पवित्र रिश्ता’ ही अभिनेत्याची पहिली मालिका नव्हती…
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने सुशांत सिंग राजपूतला ओळख मिळवून दिली. परंतु, फार कमी लोकांना माहिती आहे की, अभिनेत्याने त्याच्या करिअरची सुरुवात सेकंड लीड म्हणून केली होती. सुशांत सिंग राजपूतने २००८ मध्ये प्रसारित झालेल्या ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेमधून पदार्पण केलं होतं.
‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेच अभिनेता हर्षद चोप्रा याने मुख्य भूमिका साकारली होती. मालिकेमध्ये सुशांत यांने हर्षदच्या सावत्र भावाची भूमिका साकारली होती. मालिकेत सुशांत याने ‘प्रीत जुनेजा’ ही भूमिका बजावली होती.. पण सुशांत याने मालिकेत फक्त एक वर्ष काम केलं… सुशांत याने टीव्हीविश्वातून अभिनयाची सुरुवात केली. पण अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये देखील अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्याने काम केलं…
सुशांत याने ‘काय पो चे’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.. त्यानंतर अभिनेता अनेक सिनेमांमध्ये झळकला. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांच्या यादीत सुशांत सिंह राजपूत हे नाव देखील फार मोठं होतं… पण अभिनेत्याने १४ जून २०२० मध्ये अखेरचा निरोप घेतला…