मुंबई | नव्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागतो. शिवाय फक्त अभिनेत्रीच नाही तर अभिनेत्यांना देखील कास्टिंग काउच सारख्या वाईट अनुभवाचा सामना करावा लागतो. प्रसिद्धी, पैसा, संपत्ती.. यांसारख्या अनेक गोष्टींमुळे झगमगत्या विश्वाचं आकर्षण कित्येकांना असतं.. अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी मायानगरीत येत असतात.. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आलेल्या कास्टिंग काउचचा अनुभव मोकळेपणाने सांगितला आहे.. पण अभिनेत्री कोणाचं नाव न घेता प्रसिद्ध सेलिब्रिटींवर निशाणा साधला. पण बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने मात्र प्रसिद्ध दिग्दर्शकाचं नाव घेत गंभीर आरोप केलं आहे.
बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकावर गंभीर आरोप करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री पायल घोष आहे. नुकताच, अभिनेत्रीने ११ व्या सिनेमाची घोषणा केली आहे. अभिनेत्रीने च्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करताना इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचबद्दल मोकळेपणाने मत व्यक्त केलं आहे. सिनेमे मिळवण्यासाठी काय करावं लागतं याबद्दल अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पायल घोष म्हणाली, ‘मी माझ्या ११ व्या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. जर मी आज शारीरिक संबंध ठेवले असते तर, ३० सिनेमांमध्ये झळकली असते…’ महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीने पोस्ट शेअर करताच तात्काळ डिलिट केली. पायलच्या या पोस्टनंतर अनेक जण तिच्यावर टीका करत आहेत तर अनेकजण पायलच्या समर्थनात आहेत. सध्या सर्वत्र पायल घोष हिने केलेल्या पोस्टची चर्चा रंगत आहे.
सांगायचं झालं तर अभिनेत्री पायल घोष हिने याआधी दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर गंभीर आरोप केले होते. पायल घोषने अनुराग कश्यपवर बळजबरीने लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले होते. दिग्दर्शकावर गंभीर आरोप केल्यानंतर अभिनेत्री तुफान चर्चेत आली होती.
पायल घोष हिचा ११ वा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगत आहे. पायल बॉलिवूडमध्ये अधिक सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पायल कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.