ऑनलाइन शॉपिंग अभिनेत्रीला पडली महागात; मिनिटांत खात्यातून इतके रुपये गायब

| Updated on: Dec 30, 2022 | 1:00 PM

सावधान! ऑनलाइन कपडे खरेदी करताय? प्रसिद्ध अभिनेत्रीची फसवणूक; एक फॉर्म भरताच खात्यातून इतके रुपये गायब

ऑनलाइन शॉपिंग अभिनेत्रीला पडली महागात; मिनिटांत खात्यातून इतके रुपये गायब
ऑनलाइन शॉपिंग अभिनेत्रीला पडली महागात; मिनिटांत खात्यातून इतके रुपये गायब
Follow us on

Payal Rohatgi cyber fraud : अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री तिच्या रोजच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच पायलने तिच्यासोबत झालेल्या ऑनलाईन फसवणुकीबद्दल सांगितलं आहे. याप्रकरणी अभिनेत्रीने तक्रार दाखल केली आहे. सायबर सेलद्वारे उपलब्ध झालेल्या कस्टमर केअरसोबत संपर्क साधला अभिनेत्रीला असता मदत मिळाली नाही. सतत फोन करून देखील मदत मिळाली नसल्याची तक्रार अभिनेत्रीने केली आहे.

अभिनेत्री म्हणाली, ‘वर्कआऊट क्लोथसाठी मी एका प्रसिद्ध ब्राँडमधून ऑनलाईन शॉपिंग केली. जेव्हा कपड्यांची घरी डिलिव्हरी झाली, तेव्हा कपड्याची साईझ व्यवस्थित नव्हती. मी कपडे परत करण्यासाठी अप्लाय केलं.’ कपडे पुन्हा पाठवत असताना अभिनेत्रीची फसवणूक झाली. (Payal Rohatgi cyber fraud)

प्रसिद्ध ब्राँडच्या एका माणसाने येवून कपडे घेतले. त्यानंतर मला जवळपास २० दिवसांनी मला फोन आला, की कपडे अद्याप परत आलेले नाही. तेव्हा मी कंपनीला रिर्टन स्टेटसची माहिती घेण्यासाठी फोन केला. पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझी चुकी झाली, की गूगलवरून कस्टमर केअर नंबरची माहिती काढली.’

 

 

मिळालेल्या नंबरवर पायलने संपर्क साधला एवढंच नाही, तर लाईव्ह चॉट देखील केलं. संपर्क झाल्यानंतर त्यांनी पायलला काही फॉर्म भरण्यासाठी सांगितले. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी ऑप्लिकेशन फॉर्म देखील डाऊनलोड केले. त्या फॉर्मच्या रजिस्ट्रेशनसाठी १० रुपये फी होती. मी ऑनलाईल १० रुपये भरले.’

‘तेव्हा कस्टमर केअरने मला माझे कार्ड डिटेल्स टाकण्यास सांगितलं. पुढे त्यांनी मला ओटीपी विचारलं आणि मी ओटीपी सांगितलं. तेव्हा माझ्या खात्यातून १० रुपये नाही, तर तब्बल २० हजार २३८ रुपये गायब झाले.’ ऑनलाईल फसवणूक झाल्यामुळे अभिनेत्री त्रस्त आहे.