मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात दिवाळीचे धमाकेदार फटाके फुटताना दिसत आहेत. बिग बॉस 17 च्या घरात मोठा हंगामा होताना दिसतोय. व्हायरल होणाऱ्या प्रोमोच्या व्हिडीओमध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये जोरदार हंगामा होताना दिसतोय. अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर थेट आपल्या पतीला लाथ मारताना देखील व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे ही दिसत आहे. अंकिता लोखंडे हिचे हे रूप पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.
बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी मोठा गेम खेळत विकी जैन याला दिलवाल्या रूममधून काढून थेट दिमागवाल्या रूमममध्ये पाठवले आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांचा हा निर्णय ऐकून विकी जैन हा खुश होताना दिसला. मात्र, हे ऐकून अंकिता लोखंडे नाराज झाली. मात्र, अंकिता लोखंडे हिला बिग बॉस म्हणतात की, तू नाराज झाली आहे. मात्र, विकी भैय्या तर खुश आहेत.
विकी जैन हा अंकिता लोखंडे हिला बोलण्यास जातो तर अंकिता थेट म्हणते की, तू निघ.. यावेळी विकी हा अंकिता हिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतानाच थेट अंकिता लोखंडे ही त्याला लाथ मारते आणि तिथून निघून जाते. यानंतर अंकिता लोखंडे ही थेट विकी जैन याला पागल वगैरे म्हणताना दिसत आहे. यानंतर अनेकदा विकी जैन हा अंकिता हिच्याजवळ जातो.
Promo #BiggBoss17 Room Shuffle se badla mahol, #AnkitaLokhande aur Vicky Jain me dooriyan pic.twitter.com/GPzbrbpiYt
— The Khabri (@TheKhabriTweets) November 13, 2023
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामधील वाद हा वाढतानाच दिसतोय. विकी जैन हा अंकिता लोखंडे हिला व्यवस्थित बोलत नसल्याने सलमान खान याने विकेंडच्या वारलाच त्याचा क्लास हा लावला होता. मात्र, आता अंकिता लोखंडे हिने थेट पती विकी जैन याला लाथ मारल्याने लोक हैराण झाल्याचे बघायला मिळत आहेत.
आता हे स्पष्ट आहे की, विकी जैन आणि अंकिता लोखंडे ही वेगवेगळ्या रूममध्ये राहणार आहेत. अंकिता लोखंडे हिने विकी जैन याला लाथ मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओनंतर अंकिता लोखंडे हिला खडेबोल हे सुनावताना दिसत आहेत. मोठया प्रमाणात अंकिता लोखंडे हिच्यावर सोशल मीडियावर टीका ही केली जातंय.