मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसतंय. बिग बॉस 17 टीआरपीमध्ये टाॅपला राहिल असा विश्वास निर्मात्यांना आहे. मात्र, दुसरीकडे एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. कारण घरात नेहमीच सर्वांसोबत धमाल करणारी मनारा चोप्रा ही ढसाढसा रडताना दिसतंय. मनारा चोप्रा हिचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.
बिग बॉस 17 मध्ये मनारा चोप्रा ही सर्वाधिक चर्चेत असणारी स्पर्धेक आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांना मनारा चोप्रा ही आणि तिचा गेम जबरदस्त आवडताना दिसतोय. बिग बॉस 17 मधील सर्वात तगडी स्पर्धेक म्हणून मनारा चोप्रा हिच्याकडेच बघितले जाते. मात्र, अनेकदा घरातील इतर सदस्यांच्या निशाण्यावर मनारा चोप्रा ही असते.
अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये आतापर्यंत मोठा वाद हा बघायला मिळालाय. अंकिता लोखंडे ही नेहमीच मनाराला टार्गेट करते. नुकताच झालेल्या राशन टास्कनंतरही अंकिता मनारा हिच्या मागे लागल्याचे दिसते. नुकताच एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मनारा चोप्रा ही ढसाढसा रडताना दिसत आहे.
इतकेच नाही तर घरातील इतर सदस्य हे मनारा चोप्रा हिला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, मनारा चोप्रा ही आपल्याला शो सोडून जायचे असल्याचे सांगताना दिसतंय. मात्र, मनारा चोप्रा ही नेमक्या कोणता कारणामुळे रडत आहे हे अजूनही कळू शकले नाहीये. हा व्हिडीओ मात्र, चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, अरे या मनारा चोप्रा हिला काय झाले? दुसऱ्याने लिहिले की, नक्कीच या अंकिता लोखंडे हिने काहीतरी केले असावे. काही दिवसंपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये प्रियांका ही बहीण मनारा हिचा सपोर्ट करताना दिसली. यावेळी तिने एक अत्यंत खास असा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला.