सलमान खान फाटलेले बूट घालून का फिरतोय? ‘तो’ फोटो व्हायरल, लोक हैराण

| Updated on: Nov 24, 2023 | 3:05 PM

सलमान खान हा त्याच्या टायगर 3 चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान खान टायगर 3 चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला. इतकेच नाही तर या चित्रपटाने ओपनिंगला मोठा धमाका केला. टायगर 3 चित्रपटात सलमान खान याच्यासोबत कतरिना कैफ ही मुख्य भूमिकेत असून चाहत्यांनी या जोडीला मोठे प्रेम दिले.

सलमान खान फाटलेले बूट घालून का फिरतोय? तो फोटो व्हायरल, लोक हैराण
Follow us on

मुंबई : सलमान खान हा कायमच चर्चेत असणारा अभिनेता आहे. सध्या सोशल मीडियावर सलमान खान याचा एक फोटो तूफान व्हायरल होताना दिसतोय. सलमान खान याच्या या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये चक्क तो फाटलेले बूट घालून एका मुलाखतीसाठी पोहचल्याचे बघायला मिळतंय. सलमान खान याचा हा फोटो पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. अनेकांनी यानंतर थेट सलमान खान याने काैतुकही करण्यास सुरूवात केलीये. विशेष म्हणजे खरोखरच सलमान खान याच्या फोटोमध्ये त्याने घातलेले बूट हे फाटलेले आहेत. फाटलेल्या बूटामध्येच तो थेट बाहेर पडल्याचे दिसत आहे.

सलमान खान याच्या या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले की, खरोखरच काही गोष्टी या सलमान खान याच्याकडून शिकण्यासारख्या नक्कीच आहेत. इतका जास्त मोठा स्टार असूनही तो चक्क फाटलेले बूट घालून फिरत आहे. दुसऱ्याने लिहिले की, यालाच म्हणतात रिअल माणूस, कोणत्याही प्रकारचा दिखावा या सलमान खान याच्याकडे अजिबातच नाहीये. मला खरोखरच ही गोष्टी आवडलीये.

तिसऱ्याने लिहिले की, मला हा प्रश्न पडलाय की, सलमान खान आज कोट्यवधी संपत्तीचा मालक असून तो फाटलेले बूट कसे घालतो. अनेकांनी सलमान खान याचे या गोष्टीसाठी काैतुक केले आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये सलमान खान याने काळ्या रंगाचे बूट घातले असून ते समोरच्या भागातून फाटल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे.

सलमान खान हा सध्या त्याच्या टायगर 3 चित्रपटामुळे जोरदार चर्चेत दिसतोय. सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट रिलीज होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे सलमान खान याच्या चित्रपटातून शहनाज गिल आणि श्वेता तिवारी हिची लेक पलक हिने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले.

सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. यामुळेच टायगर 3 चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे टायगर 3 हा चित्रपट खरोखऱच धमाका करताना दिसतोय. सलमान खान आणि कतरिना कैफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले आहेत.