बिग बॉस ओटीटी 3 चांगलेच रंगात आले असून बिग बॉसच्या घरात मोठे हंगामे हे बघायला मिळत आहेत. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये नुकताच अरमान मलिक याने विशाल पांडे याच्या कानाखील जाळ काढला. हेच नाहीतर अनिल कपूर हे देखील विशालला म्हणतात की, जर तू चुकीचे बोलत नव्हता तर तू कटारियाच्या कानामध्ये का बोलला? नुकताच घरात एक टास्क झालाय. यावेळी कटारिया याला घरातील सदस्यांनी शिक्षा सुनावली आहे. यानुसार कटारिया याला गार्डन परिसरातच झोपायचे आहे. हेच नाहीतर त्याचे हातही बांधले आहेत.
सध्या सोशल मीडियावर बिग बॉस ओटीटी 3 च्या LIVE फुटेजचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोकांना मोठा धक्का बसलाय. फुटेजमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की, स्विमिंग पूलजवळ गार्डन परिसरात एक साप रेंगताना दिसत आहे. यापेक्षाही हैराण करणारे म्हणजे टास्कनंतर शिक्षा मिळाल्याने तिथेच लवकेश कटारिया हा बसलाय.
लवकेशच्या मागून तो साप जात आहे. मात्र, तो साप लवकेश याला दिसत नाही. कारण त्याचा चेहरा दुसऱ्या बाजूला आहे. जर चुकून तो साप लवकेश याच्याजवळ आला असता तर तो पळूनही जाऊ शकला नसता. कारण त्यावेळी लवकेश कटारिया याचे हातही बांधले होते. हा सर्व प्रकार पाहून लोक चांगलेच निर्मात्यांवर भडकल्याचे बघायला मिळतंय.
Snake behind #LuvKataria on Bigg Boss.. What’s going on with the safety measures?#BiggbossOTT3 #BiggBoss pic.twitter.com/I9qh5ZaJqT
— Biggboss Khabri (@BiggbossKaTadka) July 9, 2024
कारण तो विषारी साप लवकेश कटारिया या चावला असता. बिग बॉसच्या गार्डन परिसरातील व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर जियो सिनेमाच्या टीमच्या मेंबरने म्हटले आहे की, व्हिडीओसोबत छेडछाड करण्यात आलीये. परंतू, मुळात म्हणजे व्हिडीओ LIVE फुटेजचा आहे. ज्यानंतर निर्मात्यांनी मोठी पोलखोल झाल्याचे बघायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे साप दिसत आहे.
या प्रकारानंतर बिग बॉस ओटीटी 3 च्या निर्मात्यांनी साप घरात असल्याच्या दाव्याला नकार दिलाय. मात्र, व्हिडीओमध्ये दिसत आहे की, साप दिसल्यानंतर गार्डन परिसर हा रिकामा करण्यात आलाय. आता यासर्व हैराण करणाऱ्या प्रकारानंतर लोक जोरदार टीका निर्मात्यांवर करताना दिसत आहेत. या अगोदरही बिग बॉसच्या गार्डन परिसरात माकडे आणि वेगवेगळे पक्षी आल्याचे अनेकदा बघायला मिळाले आहे. मात्र, बिग बॉसच्या घरात साप पाहून सर्वचजण हैराण झाले.