मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मुळात म्हणजे उर्फी जावेद कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाही. उर्फी जावेद हिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. उर्फी जावेद हिने शेअर केलेला व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. या व्हिडीओमध्ये सुरूवातीला हातावर बसलेली एक माशी दाखवण्यात आली. पुढे थेट माश्यांपासूनच उर्फी जावेद हिने ड्रेस तयार केल्याचे बघायला मिळतंय. या ड्रेसमध्ये उर्फी जावेद हिचा खूप जास्त बोल्ड लूक दिसत आहे. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
एकाने लिहिले की, मी हाच विचार केला की आज घरातील सर्व माशा कुठे गेल्या? दुसऱ्याने लिहिले की, अरे यार उर्फी जावेद अगोदर सांगितले असते तर तुला मी थोड्याशा माशा तरी पाठवल्या असत्या. तिसऱ्याने लिहिले की, मुळात म्हणजे ही उर्फी कधी काय करेल हे सांगता येत नाही. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या अतरंगी स्टाईलमध्ये दिसते. लोक सोशल मीडियावर नेहमीच उर्फी जावेद हिला खडेबोल सुनावताना दिसतात. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग असून उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ नेहमीच व्हायरल होताना दिसतात. उर्फी जावेद काही दिवसांपूर्वीच मोठ्या वादात सापडली होती.
उर्फी जावेद हिने एक फेक व्हिडीओ तयार केला. त्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले होते की, कपड्यांमुळे मुंबई पोलिस हे उर्फी जावेद हिला अटक करून नेत आहेत. या व्हिडीओनंतर लोक हैराण झाले आणि अनेकांनी थेट विचारले की, खरोखरच उर्फी जावेद हिला पोलिसांकडून कपड्यांमुळे अटक करण्यात आली का? या व्हिडीओनंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली.
इतकेच नाही तर त्या व्हिडीओमध्ये फेक मुंबई पोलिस झालेल्या दोन महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेली काळ्या रंगाची गाडी देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आली. यानंतर उर्फी जावेद हिच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होताना दिसली. त्यानंतर थेट विमानतळावर उर्फी जावेद स्पाॅट झाली. ज्यानंतर चर्चा होती की, उर्फी जावेद देश सोडून पळून जात आहे.