मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच आमिर खान याचा लाल सिंह चढ्डा हा चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. लाल सिंह चढ्डा (Laal Singh Chaddha) चित्रपटामध्ये आमिर खान याच्यासोबत करीना कपूर ही मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून आमिर खान हा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आमिर खान याने काही दिवसांपूर्वी जाहिर केले की, अनेक वर्षे सतत शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने कुटुंबियांना अजिबातच वेळ देऊ शकत नाहीये. यामुळे आता काही वर्षे फक्त कुटुंबियांनाच वेळ देणार आहे.
काही दिवसांपूर्वी आमिर खान याचे काही फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. मात्र, आमिर खान याचे हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. वाढलेली पांढरी दाढी आणि थकलेला आमिर खान याचा चेहरा पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. आमिर खान याचे चाहतेही चिंतेमध्ये आले होते.
नुकताच आमिर खान याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता या व्हिडीओमुळे आमिर खान याला जोरदार ट्रोल केले जात आहे. चक्क आमिर खान याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो एका चिनी चित्रपटाला सपोर्ट करताना दिसत आहे. इतकेच नाही तर तो चित्रपट चाहत्यांना बघण्यास आमिर खान हा सांगत आहे.
#Bollywood star Aamir Khan from #India has shared a video online to support his Chinese friend, director Wang Baoqiang’s new film “Never Say Never,” which debuted at Chinese mainland cinemas on July 6. Calling the film “encouraging,” Aamir said that he hopes it can “break the… pic.twitter.com/R84s7VHnYT
— Global Times (@globaltimesnews) July 14, 2023
मुळात म्हणजे गलवान घाटीमध्ये झालेल्या झडपीनंतर चीनसोबतचे भारताचे संबंध ठिक नाहीत. चीनमध्ये भारतीय चित्रपटावर सतत बहिष्कार टाकला जातोय. मात्र, दुसरीकडे आमिर खान हा आपल्या भारतीय चाहत्यांना चीनचा चित्रपट बघण्याची विनंती करताना दिसत असल्याने सर्वांनाच मोठा धक्का हा बसला आहे. डायरेक्टर वांग बाओकियांग यांचा नेवर से नेवर या चित्रपटाचा सपोर्ट करताना आमिर खान हा दिसत आहे.
दुसरीकडे चीनमध्ये ‘भारतीयन’ हा चित्रपट बायकॉट केला जात आहे. आमिर खान याने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून लोक संताप व्यक्त करताना दिसत असून अनेकांनी म्हटले की, या आमिर खान याला चीनमध्ये पाठून द्या. काही लोकांनी आमिर याला देशद्रोही देखील म्हटले आहे. आमिर खान याच्या या व्हिडीओमुळे सतत त्याच्यावर टिका ही केली जात आहे. हा व्हिडीओ पाहून लोक थेट आमिर खान याच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करत आहेत.