मुंबई : उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारा विषय आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही कधी काय घालेल याचा अजिबात अंदाजा लावला जाऊ शकत नाही. उर्फी जावेद नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. अनेकदा उर्फी जावेद हिला थेट जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. अनेक हिट मालिकांमध्ये काम केल्यानंतर उर्फी जावेद ही बिग बाॅस ओटीटीमध्ये सहभागी झाली. बिग बाॅस ओटीटीमधूनच तिला खरी ओळख मिळाली.
आज उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. उर्फी जावेद सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून काहीतरी अतरंगी व्हिडीओ शेअर करताना दिसते. मात्र, उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ हे तूफान व्हायरल होताना दिसतात. उर्फी जावेद हिचा वादासोबत अत्यंत जवळचा संबंध आहे.
काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर टिका करताना उर्फी जावेद दिसली. उर्फी जावेद हिने राज कुंद्रा याला खडेबोल सुनावले. इतकेच नाही तर तिने थेट राज कुंद्रा याला पाॅर्न किंग म्हटले. उर्फी जावेद हिच्यावर एक कमेंट करणे राज कुंद्रा याला अत्यंत महागात पडल्याचे दिसले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने राज कुंद्राचा समाचार घेतला.
आता नुकताच शेअर केलेल्या व्हिडीओमुळे उर्फी जावेद ही तूफान चर्चेत आलीये. उर्फी जावेद ही या व्हिडीओमध्ये परत एकदा अतरंगी लूकमध्ये दिसतंय. यावेळी तर चक्क सिगारेटपासून उर्फी जावेद हिने आपला ड्रेस तयार केलाय. उर्फी जावेद हिचा हा ड्रेस पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. आता उर्फीचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.
उर्फी जावेद हिने सिगारेटचे बड्स जमा केले आणि चक्क त्याच्यापासून हा ड्रेस तयार केला. यासोबत उर्फी जावेद हिने मोठा खुलासा करत म्हटले की, हा ड्रेस तयार केल्यानंतर कितीतरी दिवस माझ्या हातांचा वास हा सिगारेटचा येत होता. आता या ड्रेसमुळे उर्फी जावेद परत एकदा चर्चेत आलीये. उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत.